कॅल्शियमची कमतरता दूर करताे सिद्ध कॅल्सी याेग!

28 Aug 2024 23:07:28
 
 
 
health
 
सर्व पाेटविकारांवर प्रभावी ठरलेले धाैती याेग आणि मूळव्याधीवर परिणामकारक इलाज करणारी धाैती याेग क्रीमच्या यशानंतर धाैती याेगच्या उत्पादकांद्वारे आता कॅल्शियमची पूर्तता करणाऱ्या आयुर्वेदिक टॅब्लेट्सची न्रिर्मिती करण्यात आलेली आहे. सिद्ध कॅल्सी याेग हे नाव असलेल्या टॅब्लेट्समधून शरीरात नैसर्गिक लाेह, व्हिटॅमिन सी आणि कॅल्शियमची कमतरता भरून काढता येणार आहे.प्रत्येकाला कॅल्शियमची गरज असतेच. पण काहीजणांच्या बाबतीत शरीरातील कॅल्शियमची मात्रा झपाट्याने कमी्र हाेते. चरकाचार्यांनी म्हटल्याप्रमाणे अतिव्यायाम, अस्थींचा क्षाेभ (दाह हाेणे), आघात हाेणे, पडणे, वातकर आहार विहार यामुळे अस्थींच्या (हाडांच्या) ठिकाणी भंग (फ्रॅक्चर), हालचालींना त्रास हाेणे, थकवा अशी लक्षणे निर्माण हाेतात.
 
शरीरामध्ये वात हाडांच्या आश्रयाने राहताे. त्यामुळे वात वाढल्यास अस्थींचे (हाडांचे) आजार निर्माण हाेतात.केस, दात, नखे ही हाडांपासून बनलेली आहेत, असा आयुर्वेदाचा सिद्धांत आहे. त्यामुळे केस गळणे, दातकिडणे, दात पडणे, त्वचेला काळवटपणा येणे अशा सुद्धा व्याधी निर्माण हाेतात.स्त्रिया, लहान मुले, वयस्कर व्यक्तींमध्ये विशेषतः हाडांना बळकटी येण्यासाठी कॅल्शियमची आवश्यकता असते. ही गरज पूर्ण करण्यासाठी आम्ही सिद्ध कॅल्सी याेग टॅब्लेट्स आणल्या आहेत. यामध्ये शंख भस्म, शाैक्तिक भस्म, कपर्दक भस्म, अर्जुन साल घन, बलामूल घन, अश्वगंधा घन यांचा नैसर्गिक कॅल्शियमचा स्राेत (पुरवठा) म्हणून वापर केला आहे. यासाेबत आयुर्वेदातील सर्वश्रेष्ठ रसायन टाॅनिक म्हणून आमलकी रसायन दिले आहे. आमलकी (आवळा) हे विटामिन ‘सी’चा उत्कृष्ट स्राेत आहे.
 
यासाेबत नैसर्गिक आयर्न मिळावे म्हणून सप्तामृत लाेहचा वापर केला आहे.स्त्रिया, मुले, पुरुष, कमजाेर व्यक्ती, वृद्ध व्यक्ती, स्पाेर्ट्समन, हाडांचा भंग (फ्रॅक्चर), (हाडे ठिसूळ हाेणे) अशा सर्वांना सिद्ध कॅल्सी याेग टॅब्लेट्स हे आयुर्वेदिक औषध अस्थिपाेषक म्हणून वापरता येईल. याचे दीर्घकाळ सेवन करावे. आयुर्वेदाच्या तज्ज्ञ वैद्यांनी या औषधाची निर्मिती केली आहे. तेव्हा या सिद्ध कॅल्सी याेगचे सेवन नियमितपणे करावे, असे आवाहन धाैती याेगच्या उत्पादकांद्वारे करण्यात आले आहे. या सिद्ध कॅल्सी याेग टॅब्लेट्स सर्व आयुर्वेदिक व औषधी दुकांनामध्ये उपलब्ध असून, धाैती याेगच्या वेबसाइटवरून किंवा अ‍ॅमेझाॅनवरूनही ऑनलाइन ऑर्डर करता येतात.
Powered By Sangraha 9.0