येरवड्यातील वस्तू व सेवाकर भवनाच्या नूतन प्रशासकीय इमारतीच्या काेनशिलेचे अनावरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करून उद्घाटन करण्यात आले.यावेळी आमदार सुनील टिंगरे, राज्य कर आयु्नत आशिष शर्मा, जिल्हाधिकारी डाॅ. सुहास दिवसे, विशेष राज्य कर आयु्नत अभय महाजन, राज्य रस्ते वकास महामंडळाचे सह-व्यवस्थापकीय संचालक राजेश पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण, अपर राज्य कर आयु्नत धनंजय आखाडे, उमाकांत बिराजदार आदी उपस्थित हाेते.उद्घाटनानंतर पवार यांनी इमारतीतील दालनांची पाहणी केली. अतुल चव्हाण आणि वास्तुविशारदांनी इमारतीतील सुविधांची पवार यांना माहिती दिली.