हा आहे खरा अ‍ॅनिमल!

    28-Aug-2024
Total Views |
 
 
 

Animal 
सलीम जावेद या लेखकद्वयीवर आधारलेल्या ‘अँग्री यंग मेन’ या डाॅक्युसिरीजचं प्रकाशन नुकतंच झालं. झाेया आणि फरहान अख्तर आणि सलमान व इतर खान बंधू या वेबसिरीजचे निर्माते आहेत. तिच्या प्रकाशन साेहळ्यात बाकीची माणसं बसून आळीपाळीने बाेलत हाेती, सलमान सर्व वेळ एक माइक घेऊन उभा हाेता आणि सतत वडिलांच्या, म्हणजे सलीम खान यांच्या मागे उभा हाेता. ते पाहून ज्याला कुणाला हा अ‍ॅनिमलमधला मुलगा आहे, असं सुचलं असेल, ताे फारच हुशार माणूस आहे. दाेन्हीमध्ये बराच फरक आहे, पण अतीव पितृभक्तीच्या बाबतीत सलमान खान अ‍ॅनिमलच्या रणबीरला टक्कर देऊ शकताे. सलमान हा सलीम यांचा माेठा मुलगा.
 
ताे जन्माला आल्यानंतर त्याला समज येण्याच्या काळापर्यंत त्यांचा स्ट्रगल सुरूच हाेता.त्यानंतर जावेद यांच्याबराेबर जाेडी जमली, अफाट यशाचा काळ या जाेडीने पाहिला आणि नंतर जावेद साहेबांनी अचानक जाेडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला, या सगळ्याला ताे साक्षी हाेता. आपल्या वडिलांवर अन्याय झाला, अशी त्याची दुखरी भावना असावी. ती त्याच्या वागण्यातून सतत दिसते. फक्त फरक इतकाच आहे की अ‍ॅनिमलमधला अनिल कपूर आपल्या मुलाकडे दुर्लक्ष करताे. सलीम खान यांनी मात्र कायम सलमानची पाठराखण केली आहे, त्याच्या चुकांवर पांघरूण घातलं आहे.