फिन्निस पक्ष्याप्रमाणे उभारलेला टेनिसपटू आंद्रे आगासी

27 Aug 2024 23:00:21
 
 

tennis 
 
माेठ्या तिनही मुलांना त्यांनी टेनिसचे धडे द्यायचा प्रयत्न केला पण त्यांच्या मते माेठ्या तीनही मुलांमधे मुळातच किलर इंस्टीं्नट चा अभाव हाेता. आंद्रे चार भावंडात सगळ्यात लहान.ला व्हेगास ह्या गावात राहणारा. आगासीच्या वडिलांनी ताे लहान असतानाच ताे टेनिस चॅम्पियन हाेणार, जगातला एक नंबरचा खेळाडू हाेणार, हे ठरवून टाकलं हाेतं. ते क्रूर नव्हते, पण ठाम नक्की हाेते. त्यांनी आगासी लहान असतानाच घराच्या मागच्या दारी टेनिस काेर्ट तयार केलं हाेतं. एक बाॅल मशीन स्वतः तयार केलं हाेते. टेनीस काेर्ट आणि बाॅल्सचा मारा करणारं ड्रॅगनच्या आकाराचं मशिन त्यावेळी अगासीसाठी अगदी नकाेसे ठरले.सात वर्षाचा आंद्रे राेज 2000 ते 2500 बाॅल्स मारून सराव करत असे. बाॅल्सचा मारा करणारं ते मशिन हे आपलं सर्वात नावडतं खेळणं हाेतं आणि आजही ते आपल्या स्वप्नात येतं असं आंद्रे म्हणताे.
 
एकूणच त्याला ते बालपण अजिबातच आवडलं नाही असं दिसतं. इत्नया लहान वयात बराच वेळ चालणारा सराव, सतात अंगावर खेकसणारे वडील, लास वेगसचं गरम हवामान आणि ते बॅकयार्ड हे त्याला कित्येकदा नकाेसं व्हायचं आणि काही वेळापुरता का हाेईना ती प्रॅ्नटीस थांबवण्यासाठी ताे मुद्दाम बाॅल बाहेर मारायचा. इतर टेनीसपटूंच्या तुलनेत उंचीने कमी असलेल्या आंद्रेला सर्व्हीसवर थाेड्याफार मर्यादा येत असतं त्यामुळे वडिलांनी ह्याच काेर्टवर त्याच्याकडून रिटर्नचे धडे गिरवून घेतले. पुढे प्रतिस्पर्ध्याने केलेल्या घणाघाती सर्व्हिसला चाेख प्रत्युत्तर देण्यासाठी आंद्रे प्रसिध्द झाला आणि ते त्याचं महत्त्वाचं शक्तिस्थान झालं !माेठ्या स्पर्धा जिंकताना वारंवार येणारं अपयश, लग्नाचा फसलेला डाव ह्यातून ताे नैराश्याकडे, व्यसनाधीनतेकडे ओढला गेला.
 
आता हा संपला, मुळात ताे तेवढा चांगला खेळाडू नव्हताच ह्या आवया उठू लागल्या. पण राखेतून जिवंत हाेणाऱ्या फिन्निस पक्ष्याप्रमाणे ताे पुन्हा काेर्टवर उतरला. जिंकू लागला. पूर्ण कारकीर्दीत सगळ्या ग्रँड स्लॅम स्पर्धा आणि त्यासाेबत ऑलिंपिक सुवर्णपदकही जिंकून ताे गाेल्डन स्लॅमचा मानकरी झाला.अगासी हा कारकिर्दीत चारही ग्रँडस्लॅमची विजेतेपदं आणि ऑलिंपीक सुवर्णपदक अशी दुर्मिळ कामगिरी करणारा टेनीसपटू आहे. त्याच्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्याला साथ देणारी आणि मदत करणारी काही लाेकं हाेती त्यातली महत्त्वाची व्यक्ती म्हणजे त्याचा फिटनेस ट्रेनर गील. ताे ट्रेनर बराेबरच त्याचा मित्र, बाॅडीगार्ड, सल्लागार सर्वकाही हाेता. स्टेफीची आणि त्याची प्रेम काहाणी सुरु झाली तीच विंबल्डन दरम्यान. ती स्पर्धा स्टेफीची शेवटची विंबल्डन स्पर्धा ठरली पण त्यांनी त्या स्पर्धेत एकत्र सराव केला हाेता. स्टेफीला व्यावसायीक टेनीसपटूच्या आयुष्यातल्या समस्या, ताण-तणाव, आनंदाचे क्षण व्यवस्थित माहित असल्याने तीने नेहमीच आंद्रेला याेग्य ती साथ दिली.
Powered By Sangraha 9.0