उद्याेग, व्यवसाय आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी विमानतळ अत्यंत महत्त्वाचे आहे. हेलिकाॅप्टर सेवा, टुरिस्ट सर्किट तयार केल्यास माेठा फायदा हाेणार आहे. नाेकरी मागणाऱ्यांपेक्षा नाेकरी देणारे हात तयार करावेत, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.रत्नागिरी विमानतळाच्या टर्मिनल इमारतीचे आणि काेनशिलेचे अनावरण करून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. यावेळी पालकमंत्री उदय सामंत, आमदार शेखर निकम, रवींद्र फाटक, काेकण परिक्षेत्राचे विशेष पाेलीस महानिरीक्षक संजय दराडे, विमानतळ प्राधिकरणाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती पांडे, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तिकिरण पुजार, सिंधुरत्न समृद्ध याेजनेचे विशेष निमंत्रित सदस्य किरण सामंत, मिरजाेळेचे सरपंच रत्नदीप पाटील, शिरगावच्या सरपंच फरिदा काझी आदी उपस्थित हाेते.दाेन महिन्यांपूर्वी विमानतळाबाबत बैठक आयाेजित केली हाेती.मुख्यमंत्र्यांनी टर्मिनल इमारतीसाठी 100 काेटींचा निधी देण्याचा निर्णय घेतला. गतिमान पद्धतीने सर्व परवानग्या मिळाल्या. दीड वर्षांत हे पूर्ण हाेईल, असा विश्वास सानंत यांनी व्यक्त केला. टर्मिनलवर बांबूपासून बनवलेले फर्निचर सर्वत्र पाहायला मिळेल, असेही त्यांनी सांगितले.