लाेणावळ्यातील विकासकामांचा अजित पवार यांच्याकडून आढावा

22 Aug 2024 23:49:05
 


Pawar 
 
लाेणावळा व खंडाळा ही राज्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळे असून, येथे येणाऱ्या पर्यटकांना चांगल्या साेयीसुविधा मिळण्यासाठी राज्य शासन सर्व प्रकारची मदत करणार आहे. या शहराच्या भविष्यातील लाेकसंख्येचा, पर्यटकांचा विचार करून खंडाळा भागासाठी 5 एमएलडी क्षमतेचा जलशुद्धीकरण प्रकल्प आणि लाेणावळ्यासाठी विविध 9 ठिकाणी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्याची कार्यवाही गतीने करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.लाेणावळा नगरपरिषदेच्या विविध प्रलंबित प्रकरणांचा पवार यांनी मंत्रालयातील कक्षात आढावा घेतला.
 
बैठकीस आमदार सुनील शेळके, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी.गुप्ता, नियाेजन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगाेपाल देवरा, गृहनिर्माण विभागाच्या अपर मुख्य सचिव वल्सा नायर सिंह, ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव असिमकुमार गुप्ता, डाॅ. के. एच. गाेविंदराज, सार्वजनिक बांधकाम विभागाचे (रस्ते) सचिव सदाशिव साळुंखे, वीज वितरण कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक लाेकेश चंद्रा, नगरपरिषद प्रशासन संचालनालयाचे संचालक मनाेज रानडे उपस्थित हाेते.पुण्याचे विभागीय आयु्नत डाॅ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी सुहास दिवसे, पुण्याचे नगररचना आणि मूल्यनिर्धारण विभागाचे संचालक अविनाश पाटील आदी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे सहभागी झाले हाेते.भांगरवाडी-नांगरगाव रेल्वे उड्डाणपुलाचे उर्वरित काम नगरपरिषद आणि रेल्वे प्राधिकरणाने तातडीने करावे.
 
उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले असले तरी पुलाच्या दाेन्ही बाजूला भराव टाकून रस्ता केल्याशिवाय या उड्डाणपुलाचा उपयाेग हाेणार नाही. त्यामुळे या कामाच्या भूसंपादनासाठी राज्य शासनामार्फत 15 काेटींचा निधी देण्यात येईल.जिल्हाधिकारी कार्यालयाने नगरपरिषदेच्या साह्याने तातडीने भूसंपादन प्रक्रिया सुरू करावी, असे निर्देश पवार यांनी दिले.लाेणावळ्याचा विकास आराखडा अंतिम करताना हनुमान टेकडी परिसरातील म्हाडा घरकुलांना वाढीव एफएसआय देण्याबाबत नगरविकास सचिवांनी संबंधितांची बैठक घेऊन तातडीने कार्यवाही करावी. वाहनांची वाढती संख्या लक्षात घेऊन जुन्या मुंबई-पुणे महामार्गाच्या लाेणावळा शहरातील दाेन कि.मी. मार्गाचे नगरपरिषदेच्या निधीतून रुंदीकरणाच्या प्रस्तावास रस्तेविकास महामंडळाने ना-हरकत प्रमाणपत्र द्यावे.नगरपरिषदेला पाण्याच्या टाकीसाठी आवश्यक असलेली सार्वजनिक बांधकाम विभागाची 6.5 गुंठे जागा मिळण्यासाठी एकत्रित पाहणी करून सध्याच्या टाकीलगतची जागा तातडीने देण्याचे निर्देशही पवार यांनी दिले.
Powered By Sangraha 9.0