‘छत्रपती शिवाजी महाराज : एक युगप्रवर्तक सेनानी' या ग्रंथाचे 19 ऑगस्ट रोजी प्रकाशन

17 Aug 2024 13:27:02
 
 
ch
 
सातारा, 16 ऑगस्ट (आ.प्र.) :
 
प्राचार्य रमणलाल शहा शनिवारी (17 ऑगस्ट) 91 व्या वर्षात पदार्पण करीत असून, त्याचे औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर त्यांनी लिहिलेल्या छत्रपती शिवाजी महाराज : एक युगप्रवर्तक सेनानी या ग्रंथाचा प्रकाशन समारंभ सोमवारी (19 ऑगस्ट) दुपारी 4.00 वाजता सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सभागृह, जिल्हा परिषदेसमोर, सदरबझार, सातारा येथे आयोजित केला आहे.
 
या प्रकाशन समारंभास खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, आमदार श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसले, श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, माजी खासदार श्रीनिवास पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार महेशदादा शिंदे, महाराष्ट्र शासनाचे माजी उपसचिव चंद्रकांत दळवी, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलीस अधीक्षक समीर शेख, सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती याशनी नागराजन, शिवसेनेचे उपनेते (ठाकरे गट) नितीन बानुगडे पाटील, चित्रपट व मालिका लेखक प्रताप गंगावणे, ख्यातनाम वक्ते प्राचार्य यशवंत पाटणे, भाजप सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, सातारा एज्युकेशन सोसायटीच्या चेअरमन श्रीमती चेतना माजगावकर, लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र शेजवळ, महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शहर सदस्य शिरीष चिटणीस उपस्थित राहणार आहेत.
 
या ग्रंथाला शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर व पुणे विद्यापीठाचे कुलगुरू, प्रशासनातील नामवंत व्यक्ती, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे दोन माजी अध्यक्ष, शिवचरित्राचे अभ्यासक व व्यासंग असणारे अशा 11 नामवंतांचे अभिप्राय या ग्रंथाला लाभले आहेत. या प्रकाशन समारंभास जिल्ह्यातील सर्व शिवप्रेमी, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक, उद्योग, बँका, कायदा, सहकार इ. सर्व क्षेत्रांतील व्यक्तींनी उपस्थित राहावे, असे आवाहन नितीन शहा व रोहित शहा यांनी केले आहे.
Powered By Sangraha 9.0