विमान उड्डाणांतील ‘टर्ब्युलन्स’मागे हवामानातील बदल कारणीभूत

    09-Jul-2024
Total Views |
 
 
 

turbulence 
वेळ वाचविण्यासाठी विमान प्रवासाला आता प्राधान्य दिले जाते. काेणत्याही प्रवासाप्रमाणे यातही थाेडी जाेखीम असते. मात्र, आता हवामानातील बदलांचा फटकाही बसायला लागला आहे. हवेच्या अतिप्रक्षुब्धतेचा फटका नुकताच दाेन विमानांना सहन करावा लागला. प्रक्षुब्धता म्हणजे टर्ब्युलन्स.या फट्नयामागे हवामानातील बदल हे मुख्य कारण असल्याचे आढळले. हवामानातील बदलांचा, विशेषत: उष्म्याच्या लाटांचा विमान प्रवासावर कसा घातक परिणाम हाेत आहे, या बाबतच्या बातम्याही येत आहेत. अत्यंत गरम दिवस हा विमानांच्या उड्डाणासाठी त्रासदायक असताे आणि जगभरातील गरम हवामानामुळे विमानांच्या उड्डणांत अडथळे येतात. या वर्षाअखेर विमान प्रवाशांची जागतिक संख्या 9.7 अब्जांपर्यंत पाेहाेचण्याचा अंदाज असताना उड्डाणांतील समस्यांमागे हवामानातील बदल असणे ही बातमी चांगली नाही.
 
बदलत्या हवामानामुळे हाेत असलेल्या तीव्र प्रक्षुब्धतेचा (सिव्हियर टर्ब्युलन्स) फटका कतार एअरवेज आणि सिंगापूर एअरलाइन्सच्या विमानांना नुकताच सहन करावा लागला.जमिनीवरील उष्ण तापमानामुळे विमानाला उड्डाणासाठी गरजेची असलेली आवश्यक उचल (लिफ्ट) मिळत नाही. त्यामुळे हवामानातील बदल हे उड्डाणांतील अडथळ्यांचे माेठे कारण हाेण्याची श्नयता वाढली आहे. प्रक्षुब्धतेचा फटका विमानांना बसण्याच्या घटना नवीन नाहीत. अमेरिकेच्या हवाई वाहतूक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 2009 ते 2022 या काळात टर्ब्युलन्समुळे विमान प्रवासी आणि कर्मचारी मिळून 163 जण जखमी झाले आहेत. अमेरिकेत दर राेज 2.9 दशलक्ष लाेक विमानाने प्रवास करतात.दाेहा-डब्लिन या मार्गावर असलेल्या कतार एअरवेजच्या विमानाला मे महिन्यात बसलेल्या टर्ब्युलन्सच्या फट्नयामुळे बारा प्रवासी जखमी झाले.
 
हे विमान तुर्कियेवरून जात असताना ही घटना घडून त्यात सहा प्रवासी आणि सहा कर्मचारी जखमी झाले. त्यातील आठ जणांना रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करावे लागले. सिंगापूर एअरलाइन्सच्या विमानालाही नुकतेच अशा प्रसंगाला सामाेरे जावे लागून त्यात एका प्रवाशाचा मृत्यू झाला आणि 100 प्रवासी जखमी झाले. त्यातील 48 प्रवाशांवर अजूनही उपचार सुरू आहेत.टर्ब्युलन्सचे प्रकार गेल्या काही वर्षांत वाढले असल्याने विमान उड्डाणात त्याचे अडथळे येत असल्याचे हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे. ब्रिटनच्या रीडिंग विद्यापीठातील संशाेधकांच्या म्हणण्यानुसार, हवाई प्रवासाठी जास्त वापर हाेत असलेल्या उत्तर अटलांटिक मार्गावर 1997 ते 2020 या काळात तीव्र प्रक्षुब्धतेच्या घटनांत 55 टक्के वाढ झाली आहे.
 
उंचावरील हवेचा गरम हवेबराेबर संयाेग हाेऊन टर्ब्युलन्सची स्थिती निर्माण हाेते. कार्बनच्या उत्सर्जनामुळे हवा गरम हाेत असल्याचे या संशाेधकांनी नमूद केले आहे. या घटनांमध्ये यंदाच्या वर्षातही वाढ झाल्याचे या विद्यापीठातील प्राध्यापक पाॅल विल्यम्स यांनी सांगितले.ते म्हणाले, की वादळे, पर्वत आणि जेट स्ट्रीम्स या नावाने ओळखल्या जाणाऱ्या हवेच्या जाेमदार प्रवाहामुळे टर्ब्युलन्स वाढला आहे. यातील ‘्नलीअर एअर टर्ब्युलन्स’ हा विमानातील हवामानविषयक रडारवर दिसत नसल्याने त्यातून सुटणे फार कठीणअसते. युनायटेड एअरलाइन्सच्या टाेकियाे-हाेनाेलुलू या मार्गावरील विमानाला 28 डिसेंबर 1997 राेजी ‘्नलीअर एअर टर्ब्युलन्स’ला सामाेरे जावे लागले हाेते. हवामानातील बदल हेच टर्ब्युलन्समागील मुख्य कारण असल्याचे पुरावे मिळत आहेत.
 
उत्तर अटलांटिक मार्गावरील ‘्निलअर एअर टर्ब्युलन्स’मध्ये 1979पासून 55 टक्के वाढ झाल्याचे आम्हाला अभ्यासात आढळल्याचे प्रा. विल्यम्स यांनी नमूद केले. हवामानातील हे बदल असेच राहिले, तर आगामी दशकांत जेट स्ट्रीम्स वाढतील, असे त्यांनी सांगितले. आगामी काळात टर्ब्युलन्समध्ये 15 टक्के वाढ हाेण्याचा अंदाज अमेरिकेच्या हवाई वाहतूक विभागाचे सचिव पेट बटिगिग यांनीही व्यक्त केला आहे. सिंगापूर एअरलाइन्सच्या विमानाबाबत घडलेली घटना दुर्मीळ असली, तरी आम्ही सर्व श्नयतांना सामाेरे जाण्याची तयारी करत असल्याचे त्यांनी सांगितले.गरम हवामानामुळे उड्डाणाच्या वेळी विमानात किती वजन असावे याला मर्यादा येतात आणि त्यामुळे विमानातील प्रवाशांच्या संख्येबराेबरच सामानही कमी करावे लागत असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली. विमानातील इंधनाच्या प्रमाणावरही मर्यादा आणाव्या लागतात. सध्याच्या स्थितीत प्रदूषण आणि विमान प्रवासात घट हाेण्याची श्नयता नसल्याने टर्ब्युलन्सच्या समस्येतून मार्ग शाेधावा लागणार आहे.