भारतीय लाेकांचा शिक्षणापेक्षा लग्नावर दुप्पट खर्च : अहवालातील दावा

    09-Jul-2024
Total Views |
 
 
 
 

Marriage 
 
भारतात शिक्षणापेक्षाही अधिक खर्च लग्न संस्कारावर केला जात असल्याचे एका अहवालाद्वारे समाेर आले असून, हा ‘विवाह उद्याेग’ अंदाजे 10 लाख काेटी रुपयांवर गेला आहे आणि अन्न आणि किराणा मालानंतर या उद्याेगात देश दुसऱ्या क्रमांकावर आहे.एका अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. शिक्षणाच्या तुलनेत भारतीय विवाहांवर सरासरी दुप्पट खर्च करतात. भारतात दरवर्षी 80 लाख ते 1 काेटी विवाह हाेतात, या तुलनेत चीनमध्ये 70-80 लाख आणि अमेरिकेत 20- 25 लाख विवाह हाेतात. ब्राेकरेज फर्म जेफरीजने एका अहवालात म्हटले आहे की, भारतीय विवाह उद्याेग यूएस (70 अब्ज) उद्याेगाच्या जवळपास दुप्पट आहे. जरी ते चीन (णड 170 अब्ज) पेक्षा लहान असले तरी, अहवालानुसार, भारतात उपभाेगाच्या श्रेणीमध्ये विवाह दुसऱ्या क्रमांकावर आहे.जर विवाहसाेहळा एक श्रेणी असेल, तर ती अन्न आणि किराणा मालानंतर (681 अब्ज) दुसरी सर्वांत माेठी किरकाेळ श्रेणी असेल.भारतातील विवाहसाेहळे भव्य असतात आणि त्यात अनेक समारंभ आणि खर्चाचा समावेश असताे.
 
यामुळे दागिने आणि पाेशाख यांसारख्या श्रेणींच्या वापरात वाढ हाेते आणि वाहन आणि इलेक्ट्राॅनिक्स उद्याेगांना अप्रत्यक्षपणे फायदा हाेताे. भव्य विवाहसाेहळ्यांना आळा घालण्यासाठी प्रयत्न केले जात असतानाही, परदेशात हाेणारे भव्य विवाह भारतीय भव्यतेचे प्रदर्शन करीत आहेत. दरवर्षी 80 लाख ते 1 काेटी विवाहसाेहळ्यांसह, भारत हे जगातील सर्वात माेठे वेडिंग डेस्टिनेशन आहे, असे जेफरीज म्हणाले. अहवालानुसार, हा खर्च अंदाजे 130 अब्ज अमेरिकन डाॅलर्स इतका आहे.अमेरिकेतील भारताचा विवाह उद्याेगात जवळजवळ दुप्पट आणि माेठ्या उपभाेग श्रेणीमध्ये लक्षणीय वाटा आहे. भारतीय विवाहसाेहळे बरेच दिवस चालतात आणि ते अगदी साध्या ते उधळपट्टीपर्यंत असतात. यामध्ये प्रदेश, धर्म आणि आर्थिक पार्श्वभूमी महत्त्वाची भूमिका बजावते. अहवालात असेही म्हटले आहे की, भारतात लग्नावर हाेणारा खर्च हा शिक्षणाच्या (पदवीपर्यंत) दुप्पट आहे, तर अमेरिकेसारख्या देशांमध्ये हा खर्च शिक्षणाच्या निम्म्याहून कमी आहे.