परदेशात जाण्यापूर्वी भारतातील ही ठिकाणे अवश्य पाहा...

    09-Jul-2024
Total Views |
 
 

India 
 
माैलांग : हे छाेटेसे टुमदार खेडे ईशान्येकडील मेघालय राज्यात वसलेले आहे. अतिशय हिरवागार परिसर, खळखळणारे झरे आणि झाडाच्या मुळांवरून ओलांडावे लागणारे ओढे, दाट जंगल व खासी संस्कृतीचा अनुभव घेण्यासाठी या गावाला आवर्जून भेट द्यावी.
 
गाेकर्ण : कर्नाटकच्या किनारपट्टीवर असलेले गाेकर्ण हे अतिशय टुमदार असे शहर आहे. नितळ स्वच्छ समुद्रकिनारे, सुंदर मंदिरे या ठिकाणी पाहायला मिळतात. गाेव्यातील संस्कृतीच्या अगदी विरुद्ध संस्कृती आणि अनुभूती या ठिकाणी येते. दाेन नद्यांच्या मिलनातून कानासारखा आकार निर्माण झालेल्या ठिकाणी वसलेले गाेकर्ण महाबळेश्वर हे हिंदू धर्मियांचे पवित्र स्थळ म्हणून जसे प्रसिद्ध आहे तसेच येथल्या सुंदर सम्रुद्रकिनाऱ्यांसाठी पर्यटकांचेही आवडते स्थळ आहे. गाेकर्णला पाच बीच आहेत आणि डाेंगरावरून पाहिले असता हाताची पाच बाेटे पसरावीत तसे हे किनारे दिसतात. सर्वांत प्रमुख असलेला ॐ किनारा प्रेक्षणीय. हिंदू धर्मियात अतिशय पवित्र मानले जाणारे ॐ चिन्हाच्या आकाराचा हा किनारा, निळाशार समुद्र डाेळ्यांना पुरेपूर तृप्त करतात.
 
अरुणाचल प्रदेशात झीराे व्हॅली आहे. झीराे हे भारताच्या अरुणाचल प्रदेश राज्यातील एक शहर आहे. ते लाेअर सुबांसिरी जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. थंड हवेचे ठिकाण अशी त्यांची ओळख आहे. त्या ठिकाणी आपातानी जमातीचे लाेक राहतात. या ठिकाणी निसर्गसुंदर परिसर, हिरवीगार भातशेती आणि वैशिष्ट्यपूर्ण सांस्कृतिक अनुभूती मिळते. येथे शंभरपेक्षा जास्त खासगी आणि शासकीय शाळा आहेत. या शहराचे नाव झीराे असले तरी अरुणाचल प्रदेशात सर्वाधिक साक्षरता असलेले हे शहर आहे.
येथील साक्षरतेचे प्रमाण 66 टक्के आहे.
 
स्पिती व्हॅली - हिमालयाच्या खाेऱ्यातील दुर्गम भागात आणि अतिशय प्रतिकूल अशा हवामानाच्या ठिकाणी आपल्याला प्राचीन मठ आणि सुंदर निसर्ग पाहायला मिळताे.
 
कच्छचे रण  कच्छचा वारसा आणि संस्कृती देशात आणि जगभरात पाेहाेचावा म्हणून गुजरात पर्यटन विभागाने ‘रण उत्सव’देखील सुरू केला आहे. कच्छच्या रणात पाेहाेचताच आपल्याला रंगांनी भरलेले प्रवेशद्वार दिसेल जे टेन्ट शहरफ कडे जाते. येथे आपल्याला पारंपारिक नृत्य, संगीत,अन्न, कपडे तसेच हस्तकला, ट्रेकिंग, स्टारगेझिंगचा आनंद लुटता येताे. फ्लेमिंगाे आढळतील. चांदण्या रात्री, या ठिकाणचे साैंदर्य बघण्यासारखे असते.पाैर्णिमेच्या रात्री,येथील मिठाची जमीन अशी चमकते की जणू पृथ्वीवर जर पसरली आहे.
कच्छचे रण दिवसात पूर्णपणे पांढरे दिसतात.जणू पृथ्वी आणि आकाश एकत्र झाले आहेत. दाेघांमध्ये फरक करणे खूप कठीण हाेते.