महाराष्ट्र देशात ठरले सर्वाेत्कृष्ट कृषी राज्य

    09-Jul-2024
Total Views |
 
 


CM
 
 
पंधराव्या कृषी नेतृत्व पुरस्कार समितीचा 2024 चा सर्वाेत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार महाराष्ट्राला जाहीर झाला आहे. माजी मुख्य न्यायाधीश आणि केरळचे राज्यपाल न्या. पी.सदाशिवम यांच्या अध्यक्षतेखालील 15 व्या कृषी नेतृत्व पुरस्कार समितीने ही घाेषणा केली.नवी दिल्लीत बुधवारी (10 जुलै) हाेणाऱ्या साेहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हा पुरस्कार स्वीकारणार आहेत. या पुरस्कारांसाठी समितीने राज्यातील पर्यावरणरक्षण, अन्नसुरक्षेच्या माध्यमातून घेतलेल्या शाश्वत विकास धाेरणांची दखल घेतल्याची माहिती राज्याच्या कृषिमूल्य आयाेगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी दिली. राज्य सरकारने राज्यात बांबूलागवड, तृणधान्य- श्रीअन्न अभियान आणि औष्णिक वीजनिर्मितीत बायाेमासचा वापर अशी क्रांतिकारी पावले उचलली आहेत. त्यामुळेच हा प्रतिष्ठेच्या पुरस्कारावर महाराष्ट्राचे नाव काेरले गेल्याचे पटेल यांनी नमूद केले. यापूर्वी हा पुरस्कार 2023 मध्ये तमिळनाडूला, तर 2022 मध्ये उत्तर प्रदेशला मिळाला हाेता.