दावाेसमध्ये केलेल्या करारांबाबत श्वेतपत्रिका काढणार

    03-Jul-2024
Total Views |
 
 

Samant 
थेट परदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्राला सलग दाेन वर्षे प्रथम स्थानावर ठेवण्याचे काम उद्याेग विभागाच्या माध्यमातून झाले असून, माेठ्या प्रमाणात परदेशी उद्याेगसमूह राज्यात गुंतवणूक करण्यास इच्छुक आहेत. दावाेसमध्ये गेल्या तीन वर्षांत राज्याने केलेल्या विविध सामंजस्य करारांची, गुंतवणूक प्रकल्पांबाबतची माहिती देणारी श्वेतपत्रिका उद्याेग विभाग प्रसिद्ध करणार असल्याचे घाेषणा उद्याेगमंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत केली.विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विधान परिषदेतील विराेधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी छत्रपती संभाजीनगर येथील ऑरिक सिटीच्या अनुषंगाने उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना सामंत यांनी ही घाेषणा केली.
 
सलग दाेन वर्षांपासून महाराष्ट्र परकीय गुंतवणुकीत प्रथम स्थानावर असून, या वर्षी दावाेसमध्ये तीन लाख 72 हजार काेटींचे सामंजस्य करार करण्यात आले आहेतविशेष म्हणजे रत्ने आणि दागिन्यांचा माेठा प्रकल्प नवी मुंबईत सुरू करण्यात येणार आहे. गेल्या तीन वर्षांत दावाेसमध्ये उद्याेग विभागाच्या; तसेच महाराष्ट्र औद्याेगिक विकास महामंडळामार्फत आणि इतर विभागांच्या वतीने किती सामंजस्य करार करण्यात आले, त्याची अंमलबजावणी या सर्वांची माहिती देणारी श्वेतपत्रिका उद्याेग विभागाद्वारे काढली जाईल, असे सामंत यांनी सांगितले.
 
ऑरिका सिटीअंतर्गत दिल्ली, मुंबई इंडस्ट्रियल काॅरिडाॅअरच्या शेंद्रा आणि बिडकीन औद्याेगिक पट्ट्यात माेठ्या संख्येने विविध परदेशी कंपन्यांनी भरीव गुंतवणूक करत आपले उद्याेग सुरू केले आहेत. त्यातून राेजगाराच्या संधी व्यापक प्रमाणात निर्माण झाल्या आहेत. त्यासाेबतच अनेक नवीन परदेशी उद्याेगसमूह तेथे गुंतवणुकीसाठी पुढे येत असल्याची माहिती सामंत यांनी दिली.छत्रपती संभाजीनगरमधील वाळूज, चितेगाव, शेंद्रा, बिडकीन येथील एमआयडीसींना एकमेकांसाेबत जाेडणाऱ्या अंतर्गतवाहतुकीसाठीच्या रस्त्यांच्या कामाचा प्रस्तावही तयार असून, येत्या महिनाभरातच त्याचे काम सुरू करण्यात येईल तसेच ऑरिक सिटीपासून समृद्धी महामार्गाला जाेडणाऱ्या रस्त्याच्या कामाची निविदाप्रक्रियाही लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे सामंत यांनी सांगितले.