जिल्ह्यातील अनधिकृत 13 शाळा बंद;10 शाळांवर जि.प.ने केले गुन्हे दाखल

    27-Jul-2024
Total Views |
 
jp
 
पुणे, 26 जुलै (आज का आनंद न्यूज नेटवर्क) :
 
जिल्ह्यात आढळून आलेल्या 49 अनधिकृत शाळांपैकी 13 शाळा बंद करण्यात आल्या असून अन्य 10 शाळांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेने ही कारवाई केली आहे. पुणे, पिपरी-चिंचवड आणि जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शाळांचा यामध्ये समावेश आहे. बंद करण्यात आलेल्या 13 शाळांमध्ये पुणे शहरातील 3, पिपरी-चिंचवड येथील 2, तर ग्रामीण भागातील 8 शाळांचा समावेश आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षण अधिकारी संजय नाईकडे यांनी दिली आहे. एकूण अनधिकृत ठरलेल्या 49 शाळांपैकी 5 शाळांना मान्यता मिळाली आहे. तर, अन्य 44 शाळांपैकी 3 शाळांना राज्य शासनाकडून इरादा पत्र मिळाले आहे. तसेच 2 शाळांनी दंड भरला आहे, तर 4 शाळांनी जिल्हा परिषदेच्या निर्णयाला हायकोर्टात आव्हान दिले आहे. तर 12 शाळांवर अद्याप कारवाई बाकी आहे.
 
कारवाई करण्यात आलेल्या शाळा :
केअर फाउंडेशनची एमून्युअल पब्लिक स्कूल महमंदडवाडी, हडपसर, सोनाई इंग्लिश मिडीयम स्कूल फुरसुंगी, संस्कृती इंटरनॅशनल स्कूल आंबेगाव खुर्द, माउंट एव्हरेस्ट इंग्लिश स्कूल, कासारवाडी, श्री चैतन्य इंग्लिश मिडीयम स्कूल विशालनगर पिंपले गुरव, किडजी स्कूल शालिमार चौक दौंड, जिजाऊ एज्युकेशन सोसायटी अभंग शिशु विकास कासुर्डी (दौंड), भैरवनाथ इंग्लिश मिडीयम स्कूल मोई (खेड), सुलोचनाताई झेंडे बाल विकास मंदिर व प्राथमिक विद्यालय विकास मंदिर व प्राथमिक विद्यालय कुंजीरवाडी, (हवेली) , रिव्हरस्टोन इंग्लिश मिडीयम स्कूल, पेरणेफाटा , श्रेयान इंरनॅशनल स्कूल साईनगर गहुंजे, व्यंकटेेशरा वर्ल्ड स्कूल नारायणगाव. आयडियल इंग्लिश मिडीयम स्कूल पिंपळे गुरव, जिझम क्राइस्ट इंग्लिश मिडीयम स्कूल कामशेत, किंग्ज वे पब्लिक स्कूल रायवूड लोणावळा, ई एम एच इंग्लिश मिडीयम स्कूल फुरसंगी, रामदारा सिटी स्कूल, रामदारा लोणी काळभोर.
 
गुन्हे दाखल झालेल्या शाळा :
आयडियल इंग्लिश मिडीयम स्कूल पिंपळे गुरव, जिझम क्राइस्ट इंग्लिश मिडीयम स्कूल कामशेत, किंग्ज वे पब्लिक स्कूल रायवूड लोणावळा, ई एम एच इंग्लिश मिडीयम स्कूल फुरसंगी, रामदारा सिटी स्कूल, रामदारा लोणी काळभोर, ऑर्चिड इंटरनॅशनल स्कूल उंड्री, लिटल स्टार इंग्लिश मिडीयम स्कूल चिंचवडेनगर, पिपल ट्री एज्युकेशन ट्रस्ट गांधीनगर, पिंपळे गुरुव, तक्वा एज्युकेशन ट्रस्टची टीम्स तक्वा इस्लामिक स्कूल मक्तब कोंढवा खुर्द, ऑर्चिर्ड इंग्लिश मिडीयम स्कूल, पिंपळे गुरव.