श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात उत्साहात झाली अतिरुद्र महायज्ञाची पूर्णाहुती

27 Jul 2024 13:57:23
 
 
dag
पुणे, 26 जुलै (आ.प्र.) :
 
श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात जगाच्या कल्याणासाठी, आरोग्यसंपन्न समाजासाठी सुरू असलेल्या एकवीसदिवसीय अतिरुद्र महायज्ञाची सांगता 33 कोटी देवता याग व हर्विद्रव्य वनौषधीसह पूर्णाहुतीने झाली. रुद्रहोम, महासुदर्शन होम, संतान गोपाल कृष्ण होमासह विष्णू सहस्त्रनाम अर्चना, गणेशयाग, मेधा दक्षिणा मूर्ती होम, स्वयंवर पार्वती होमासह विविध प्रकारच्या धार्मिक विधींनी यज्ञाला प्रारंभ झाला होता. वेदमूर्ती नटराजशास्त्री यांच्यासह एकाचवेळी 65 ब्रह्मवृंद यात सहभागी झाला होता. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे अतिरुद्र महायज्ञ मंदिरात करण्यात आला.
 
त्याच्या सांगताप्रसंगी ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, राजूशेठ सांकला, ज्ञानेश्वर रासने, मंगेश सूर्यवंशी आदी उपस्थित होते. सलग वीस दिवस रुद्रहोम, गणेशयागासह विविध अभिषेक करण्यात आले. गणपती मंदिराच्या सभामंडपात भव्य होमकुंड साकारण्यात आले होते. गंगा, यमुना, इंद्रायणी, पंचगंगा, मुठा, अष्टविनायक येथील नद्या, ज्योर्तिलिंग नद्या, रामेश्वरम 21 कुंडांचे जल या काळात वापरले गेले तसेच 21 आयुर्वेदिक औषधींचा वापर करण्यात आला.
Powered By Sangraha 9.0