‌‘दिलखुलास'मध्ये कृषी संशोधन संचालकडॉ. अशोककुमार पिसाळ यांची मुलाखत

    27-Jul-2024
Total Views |
 
di 
 
मुंबई, 26 जुलै (आ.प्र.) :
 
खरीप हंगामातील पीक पेरणीचे नियोजन व कृषीविषयक विविध योजनांबाबत राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत असणाऱ्या कोल्हापूरच्या विभागीय कृषी संशोधन केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. अशोककुमार पिसाळ यांनी दिलखुलास कार्यक्रमात शेतकऱ्यांना उपयुक्त माहिती दिली असून, शाश्वत शेतीबद्दलही मार्गदर्शन केले आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमातील या मुलाखतीत डॉ. पिसाळ यांनी खरीप हंगामातील शेतीची कामे, पीक पेरणीचे नियोजन, नैसर्गिक, सेंद्रिय, शाश्वत शेती, तृणधान्ये उत्पादन, कृषीविषयक तंत्रज्ञान व संशोधन; तसेच पीक विमा योजनेसह कृषी विभागाच्या अन्य विविध योजनांबाबत सविस्तर माहिती दिली आहे.
 
या कार्यक्रमात ही मुलाखत शनिवारी (27), सोमवारी (29) व मंगळवारी (30 जुलै) सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व न्यूज ऑन एआयआर या मोबाइल ॲपवर प्रसारित होईल. कोल्हापूर जिल्हा माहिती कार्यालयाच्या माहिती अधिकारी वृषाली पाटील यांनी ही मुलाखत घेतली आहे.