महापालिकेच्या आरोग्य प्रमुखपदी डॉ. नीना बोऱ्हाडे

27 Jul 2024 14:26:03
 
maha
 
पुणे, 26 जुलै (आज का आनंद न्यूज नेटवर्क) :
 
महापालिकेच्या आरोग्य प्रमुखपदी नांदेडच्या जिल्हा माताबाल संगोपन अधिकारी डॉ. नीना बोऱ्हाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य शासनाने गुरुवारी या संदर्भातील आदेश काढले असून, शुक्रवारी त्या पदभार स्वीकारतील, अशी माहिती महापालिकेतील अधिकाऱ्यांनी दिली. महापालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ. भगवान पवार यांचे शासनाने निलंबन केले आहे. त्यांच्या निलंबनानंतर मागील दीड महिन्यापासून महापालिका सेवेतील उपआरोग्य प्रमुख डॉ. कल्पना बळीवंत यांच्याकडे आरोग्य प्रमुखपदाचा अतिरिक्त कार्यभार आहे.
 
दरम्यान, बुधवारी रात्री राज्य शासनाने आणखी उपायुक्त दर्जाच्या दोन अधिकाऱ्यांची महापालिकेमध्ये नियुक्ती केली आहे. यामध्ये गोंदिया नगरपरिषदेचे मुख्य अधिकारी सुनील बल्लाळ आणि चाळीसगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत ठोंबरे यांचा समावेश आहे. हे दोघेही महापालिकेत दाखल झाले आहेत. लोकसभा निवडणूक आचारसंहितेवेळी शासन सेवेतील पाच उपायुक्तांची शहरातून बदली झाली होती.
Powered By Sangraha 9.0