तंदुरुस्तीसाठी आठ तास झाेप आवश्यक

    26-Jul-2024
Total Views |
 
 
 
thoughts
 
शरीरावरील टॅटूंमध्ये वापरल्या जाणाऱ्या शाईमुळे ‘लिम्फाेमा’ (lymphoma)हा कर्कराेग हाेण्याची जाेखीम असल्याचे स्वीडनमधील एका अभ्यासात आढळले आहे.‘ई्निलनिकल मेडिसीन’मध्ये प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार, लसिका गाठींमुळे (lymphoma nodes) हाेणारा हा कर्कराेग हाेण्याची जाेखीम या शाईमुळे वाढू शकते. या संदर्भात संशाेधकांनी जीवनशैलीबाबत एक प्रश्नावली तयार करून ती 1,398 लाेकांना पाठविली हाेती. या सर्वांना 20 ते 60 वर्षांच्या वयात ‘लिम्फाेमा’चा त्रास झाला हाेता.याच वयाेगटांतील; पण ‘लिम्फाेमा’ न झालेल्या 4,193 लाेकांनासुद्धा ही प्रश्नावली पाठविण्यात आली हाेती. या सर्वांच्या उत्तरांची संशाेधकांनी छाननी केली. हा विकार झालेल्यांच्या गटातील 21 टक्के लाेकांनी टॅटू काढून घेतले हाेते आणि विकार नसलेल्यांच्या गटात हे प्रमाण 18 टक्के हाेते.
 
टॅटू काढलेल्यांना वय, धूम्रपान आणि अन्य घटक विचारात घेता, हा कर्कराेग हाेण्याची जाेखीम 21 टक्के असल्याचे या संदर्भातील लेखात म्हटले आहे. मात्र, कर्कराेगाच्या जाेखमीमागे टॅटूचा आकार हा महत्त्वाचा मुद्दा नाही. टॅटूचा आकार लहान-माेठा असला, तरी ताे काढताना जळजळ हाेते आणि त्यातून कर्कराेगाची जाेखीम वाढत असल्याचेही त्यात म्हटले आहे. टॅटू काढताना वापरली जाणारी शाई शरीरात गेल्यावर काेणती तरी बाह्य वस्तू आल्याचे जाणवून राेगप्रतिकारशक्ती कार्यान्वित हाेते आणि त्यातून लसिका गाठी सक्रिय हाेतात.बहुसंख्य लाेक तरुणपणी टॅटू काढून घेत असल्यामुळे त्यांच्यावर या शाईचा दीर्घकालीन परिणाम हाेत असल्याचेही या लेखात स्पष्ट करण्यात आले आहे.
 
आपले दिवसभराचे याेग्य चक्र असे हवे उत्तम प्रकृतीसाठी नियमित दिनचर्ये ला महत्त्व आहे. मात्र, त्यात झाेप, बसणे, उभे राहणे आणि व्यायामासाठी किती तास अथवा वेळ द्यावा असा मुद्दा येताे. हृदयाच्या आराेग्याशी संबंधित (Cardiometabolic) हा मुद्दा महत्त्वाचा असताे. ‘डायबेटाेलाॅजिया’मधील एका लेखातील माहितीनुसार, संशाेधकांनी हे काेडे साेडविण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासाठी त्यांनी 40-75 वर्षे वयाेगटांतील 2,388 सहभागींच्या वर्तणुकीचा 24 तासांसाठी अभ्यास केला. त्यात 48.7 टक्के महिला हाेत्या. या अभ्यासातून आपला आदर्श दिनक्रम कसा असावा हे संशाेधकांनी निश्चित केले. बसण्यासाठी सहा तास, उभे राहण्यासाठी 5 तास 10 मिनिटे, झाेपेसाठी 8 तास 20 मिनिटे, हल्नया तीव्रतेच्या व्यायामासाठी 2 तास 10 मिनिटे आणि मध्यम ते तीव्र क्षमतेच्या व्यायामासाठी 2 तास 10 मिनिटे वेळ दिला पाहिजे, असे संशाेधकांचे म्हणणे आहे.
 
दैनंदिन कामे आणि घरकामांचा समावेश हल्नया स्वरूपाच्या व्यायामात हाेताे. वेगाने चालणे, जाॅगिंग अथवा जिम वर्कआउटचा समावेश तीव्र स्वरूपाच्या व्यायामांत हाेताे. बसण्याचा वेळकमी करून शारीरिक हालचालींचा काळ वाढविणे टाइप-2 मधुमेह असलेल्यांसाठी फायदेशीर ठरत असल्याचे या लेखात म्हटले आहे.सध्याच्या काळात बैठी जीवनशैली वाढली असून, सतत एका जागी बसणे टाळा. थाेड्या शारीरिक हालचाली करा, असा सल्लाही लेखात देण्यात आला आहे.विमान प्रवासाच्या काळात मद्यपान करणे हृदयाच्या आराेग्यासाठी धाेकादायक ठरू शकत असल्याचे ‘थाेरा्नस’मधील एका लेखात नमूद करण्यात आले आहे. दीर्घ पल्ल्याच्या विमान प्रवासात असे मद्यपान टाळणे याेग्य ठरत असल्याचे जर्मन शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.
 
‘क्रुझिंग अल्टिट्यूड’मुळे तरुण आणि निराेगी व्यक्तींमधील ब्लड ऑ्निसजनची पातळी सुमारे 90 टक्के घटते. अशी काेणतीही पातळी घटण्यास हूिेलरीळल हूिेुळर असे म्हणतात.यात रक्तातील ऑ्निसजनची पातळी घटते. अल्काेहाेलमुळे रक्तवाहिन्यांच्या भिंती शिथिल हाेऊन झाेपेच्या काळात हृदयाच्या ठाे्नयांची गती वाढते.विमान प्रवासात अल्काेहाेल आणि केबिन प्रेशरचा काय परिणाम हाेताे याचा संशाेधकांनी अभ्यास केला.त्यासाठी 18 ते 40 वर्षे वयाेगटांतील 48 जणांची पाहणी करण्यात आली.त्यातील निम्म्यांना हवेच्या नेहमीच्या दबावात झाेपण्यास सांगितले गेले आणि निम्म्यांना क्रुझिंग अल्टिट्यूडच्या काळातील केबिन प्रेशरच्या वातावरणात झाेपण्यास सांगितले गेले.