शासनातर्फे पूरपीडितांना पूर्ण श्नतीनिशी मदत देणार

    26-Jul-2024
Total Views |
 
 

help 
चंद्रपूर जिल्ह्यात गेला आठवडाभर मुसळधार पाऊस पडत आहे. अशात चिचपल्लीत तलाव फुटल्याने माेठे नुकसान नागरिकांना सहन करावे लागले. चिचपल्लीतील नागरिकांना प्रशासन व पदाधिकाऱ्यांमार्फत सर्वताेपरी मदत पुरवण्याच्या सूचना आधीच दिल्या आहेत.पुराची प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर अनेक घरांचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे निदर्शनास आले. घरातील धान्याची नासाडी झाली आहे. घरातील कपडे व इतर साहित्य पाण्यासाेबत वाहून गेले आहे. या संकटाच्या काळात शेवटच्या नुकसानग्रस्त गरजूपर्यंत मदत पाेहाेचवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. पूरपीडितांच्या पाठीशी पूर्ण श्नतीनिशी उभा राहीन, अशी ग्वाही चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिला.
 
चिचपल्लीत पुराची पाहणी केल्यानंतर नागरिकांशी संवाद साधताना मुनगंटीवार यांनी ही ग्वाही दिली.यावेळी जिल्हाधिकारी विनय गाैडा जी. सी., मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जाॅन्सन, उपविभागीय अधिकारी संजय पवार, उपविभागीय पाेलीस अधिकारी सुधाकर यादव, तहसीलदार विजय पवार, पाेलीस निरीक्षक सुनील गाडे, नायब तहसीलदार जितेंद्र गादेवार, संध्या गुरुनुले, डाॅ. मंगेश गुलवाडे, रामपाल सिंग, हनुमान काकडे, गाैतम निमगडे, अशाेक आलाम, साेहम बुटले आदी उपस्थित हाेते.चिचपल्लीतील पूरपीडित कुटुंबांना पहिली मदत म्हणून 5 हजार तात्काळ जमा हाेणार आहेत. या पूरपरिस्थितीबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बाेलून दुसरी मदत जास्तीत जास्त मिळावी, यासाठी प्रयत्नशील आहे.
 
गावातील नाल्यावरील अतिक्रमण काढून त्यांचे पुनर्वसन करून देऊ. तसेच पूल माेठा करण्याबाबतही उपाययाेजना केल्या जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.चिचपल्ली आणि पिंपळखुट येथे पूरपीडितांसाेबत संवाद साधत असतानाच मुनगंटीवार यांनी पूरग्रस्तांना पहिली मदत पाच हजार रुपये तात्काळ बँकेत जमा करण्यासाठी अधिकाऱ्यांना दूरध्वनी केला. लगेच खात्यात पैसे जमा हाेत असल्याचे मेसेज नागरिकांना प्राप्त झाले, असे तहसीलदारांनी सांगितले. चिचपल्लीत 224, तर पिंपळखुट येथील 109 जणांच्या खात्यांत पैसे जमा हाेत आहेत. पुरात बकऱ्या आणि बैलजाेडी वाहून गेलेल्या नागरिकांना मुनगंटीवार यांच्या हस्ते धनादेशाचे वाटप करण्यात आले.