चष्म्याचीही नियमित तपासणी करायला हवी

    26-Jul-2024
Total Views |
 
 

health 
 
बरेचजण कित्येक दिवस चष्म्याची लेन्स साफ करीत नाही व त्याची तपासणीही करीत नाहीत. ज्यचा दुष्परिणाम त्यांच्या दृष्टीवर हाेताे.डाॅ्नटराच्या मते लेन्स एक ते सहा महिन्यांदरम्यान चेक करवून घ्यायला हवी.
 
डाेकेदुखीची तक्रार : डाेळ्यांचे स्नायू कमकुवत झाल्यामुळे डाेकेदुखीची समस्या हाेते. बदलत्या कार्यशैलीनुसार राेज लॅपटाॅप, काॅम्प्यूटर वा माेबाइलचा वापर केला जाताे. जे डाेकेदुखीचे कारण असते. तसेच एकच काम दीर्घकाळ करीत राहिल्यामुळेही अशी स्थिती निर्माण हाेते.अशावेळी पूर्वीपासून वापरत असलेल्या चश्म्याची नियमित तपासणी करणे अत्यंत आवश्यक असते.
 
ठेवा बदललेल्या नंबराची माहिती : कित्येकदा आपल्या चश्म्याचा नंबर वेगाने बदलत राहताे आणि आपण तिकडे लक्ष देत नाही. यामुळे आपल्याला अनेक इतर आजार जडतात. अशावेळी वरचेवर चश्म्याची टेस्ट करवून घेत राहावे. जेणेकरून नंबरानुसार चश्मा बदलू शकाल.
 
स्कॅ्रचची तपासणी : सामान्यत: लाेक लेन्सवर पडलेल्या स्क्रॅचचा विचार करीत नाहीत व ताे न बदलताच वापरत राहतात.स्कॅ्रचच्या लेन्सच्या वापरामुळे तसे दृष्टीचे काेणतेही नुकसान हाेत नाही पण अशाप्रकारची ग्लास सतत वापरल्यामुळे डाेळ्यांवर दाब वाढू लागताे. जाे हळूहळू प्रकाशावर परिणाम करू लागताे. ही समस्या टाळण्यासाठी प्लॅस्टिकच्या लेन्सवर स्क्रॅच काेटिंग केले जाते जेणेकरून सहजतेने ओरखडे पडू नयेत.
 
ग्लास नेहमी साफ ठेवा : चश्मा काेणत्याही खरखरीत कापडाने पुसू नका.तसेच स्वच्छ करताना जास्त जाेर लावू नका. ग्लास साफ करण्यासाठी ग्लास ्निलनर खरेदी करा व मुलायम कापडाने सफाई करा.
 
स्टाईचा धाेका : स्टाई म्हणजे रांजणवडी.ही लाल रंगाची गाठ असते. जी डाेळ्यात पुरळासारखी येते. बहुतेक पापण्यांच्या कडांजवळ येते. यामुळे धूसर दिसू ललागते. अशावेळी चष्मा तपासून घेणे अत्यंत गरजेचे असते.