मुलांना समजवा इकाे फ्रेंडली हाेण्याचा अर्थ

    26-Jul-2024
Total Views |
 
 
 
eco friendly
 
जर आपल्या घराजवळ जिथे इकाे फ्रेंडली हाेण्याच्या पद्धती सांगितल्या जातात असे एखादे ग्रीन स्कूल वा रिसायकल फॅ्नटरी असेल तर मुलांना तिथे न्या. तिथे त्यांना रिड्यूसिंग, रियूजिंग व रिसायकलिंगच्या सर्व प्रक्रियांची माहिती मिळू शकेल तसेच वातावरण बिघडवणाऱ्या वस्तूंविषयीही सांगितले जाईल.
 
रिसायकलिंग : रिसायकल हाेण्याच्या पद्धती व महत्त्व मुलांना समजावून सांगा.रिसायकलिंगचे रूटीन फाॅलाे करायला त्या सांगा. पुन्हा वापरता येणाऱ्या वस्तू पुन्हा वापरा. ज्या वस्तू पुन्हा वापरता येत नसतील त्या रिसायकलिंग फॅ्नटरीत द्यायला त्यांना सांगा.
 
आराेग्यही उत्तम राहते : इकाेफ्रेंडली हाेणे आराेग्यासाठीही कसे उत्तम आहे हे सांगून हेल्दी, फ्रेश व ऑर्गेनिक फूड खाल्ल्यामुळे आपले आराेग्य आणि पर्यावरण कसे सुरक्षित राहते हे त्यांना पटवून द्या.तसेच त्यांना शरीरासाठी काेणत्या गाेष्टी चांगल्या आहेत हेही पटवून द्या.
 
इकाे फ्रेंडली खेळणी : मुलांना छाेट्या छाेट्या गाेष्टींबाबत दक्षता राखायला सांगा.ज्या खाेलीत काेणीही नसेल तेथील बल्ब व पंखे बंद करण्याचा आदर्श त्याच्यापुढे ठेवा.तसेच ब्रश करताना नळ चालू ठेवू नये.पाण्याचा थेंब न् थेंब कसा माेलाचा आहे हे त्यांना समजावून सांगा.मुलांना खेळणी खूप आवडतात. त्यांना ग्रीन टाॅइज खरेदी करून द्या.