भारतातील श्रीमंत कुठल्या देशात स्थायिक हाेतात?

    26-Jul-2024
Total Views |
 
 
 
Dubai
 
सध्या जगभर लाेक चांगल्या संधीच्या आणि जीवनशैलीच्या शाेधात स्थलांतर करताना दिसतात.अर्थातच भारतातील गर्भ शीमंत देखील त्याला अपवाद नाहीत. त्यापैकी काहींची पसंती अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया आणि कॅनडाला असते तर अन्य काही दुसऱ्या देशांमध्ये स्थलांतरित हाेण्यास पसंती देतात. मात्र गेल्या काही वर्षातील ट्रेंड पाहिला तर भारतातील गर्भ शीमंत लाेक संयुक्त अरब अमिराती मध्ये स्थलांतरित हाेण्यास पसंती देत असल्याचे आढळून आलेले आहे. हेनले अँड पार्टनर्स या फर्मच्या अहवालात ही माहिती देण्यात आलेली आहे. ही फर्म आंतरराष्ट्रीय गुंतवणूक-स्थलांतर याविषयी सल्ला देण्याचे काम करत असते. या फर्मच्या अहवालात असे म्हटले आहे, की सुमारे 4300 काेट्याधीश व्यक्तींनी वर्षभरात भारतातून स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला आणि त्यापैकी बहुतेक जण हे संयुक्त अरब अमिरातील दुबईला स्थायिक हाेण्यास पसंती देत आहेत.
 
अहवालात असे म्हटले आहे, की माेठ्या प्रमाणावर काेट्याधीश कुटुंबे भारतातून संयुक्त अरब अमिरातील स्थलांतर करत आहेत. आमच्या मते भारताचे भारतासाठी हे स्थलांतर चिंताजनक नाही. कारण भारतातून जेवढे काेट्याधीश स्थलांतरित हाेतात त्यापैकी जास्त हाय नेट वर्थ वेल्थ इंडिविज्युअल्स (एचएनडब्ल्यूआय) भारतात तयार हाेत असतात. हे काेट्याधीश भारतीय देश साेडून दुबईमध्ये स्थलांतरित हाेत असले तरी त्यांचे व्यवसाय आणि व्यावसायिक हितसंबंध तसेच मूळचे घर भारतातच असते, ही सकारात्मक बाब आहे.आता ऑस्ट्रेलिया, सिंगापूर आणि अमेरिकेप्रमाणेच भारतातील गर्भश्रीमंत लाेक संयुक्त अरब अभिरातीकडे आकर्षित हाेत आहेत. 2022 या वर्षात दुबईतील प्राॅपर्टी मार्केटमध्ये भारतीय खरेदीदारांचा वाटा 35 हजार काेटी रुपये एवढा हाेता. 2021 च्या तुलनेत ताे दुपटीने वाढलेला आहे. दुबईतील घरांची खरेदी करणाऱ्यांमध्ये माेठा वाटा म्हणजे 40% हा वाटा भारतीयांचा आहे आणि ते प्रामुख्याने दिल्ली एनसीआर, अहमदाबाद, सुरत, हैदराबाद आणि पंजाब मधून आलेले असतात.
 
श्रीमंत भारतीय आता आपल्या व्यवसायाची कार्यालये दुबई, सिंगापूर, लंडन या ठिकाणी उघडून त्याच ठिकाणी आपल्या कुटुंबीयांना स्थायिक करण्याकडे त्यांचा कल असल्याचे दिसते. या गभश्रीमंत कुटुंबातील तरुण पिढी विशेषतः जी परदेशातून शिकून आलेली आहे आणि आता कुटुंबाच्या व्यवसायात जबाबदारी सांभाळू लागलेली आहे अशा तरुण पिढीचा कल परदेशात व्यावसायिक कार्यालय सुरू करण्याकडे असताे.विविध स्टार्टअपचे संस्थापक देखील त्यांचे कामकाज परदेशात सुरू करण्याच्या दृष्टीने त्या ठिकाणी कुटुंबाचे स्थलांतर आणि कार्यालय सुरू करत असल्याचे दिसते.यामागे अनेक कारणे आहेत.त्यातील सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे त्यांना भारतातील संभाव्य कर आणि किचकट नियमन यापासून स्वतःच्या संपत्तीचे संरक्षण हवे असते. दुसरी गाेष्ट म्हणजे परदेशात कार्यालय सुरू केले, की तेथून परदेशी बाजारपेठांपर्यंत पाेहाेचणे साेपे हाेते.