आपण किती राेमँटिक आहात?

    25-Jul-2024
Total Views |
 

romantic 
खरे राेमँटिक : जाेडीदाराने समुद्रकिनारी फिरायला जाऊ म्हणताच तिच्यासाेबत फिरायला जाण्यास तयार हाेताे. जाेडीदाराच्या वाढदिवसाच्या एक दिवस आधीच तिच्यासाठी फुलांचा गुच्छ पाठवताे. जाेडीदाराला आवडणारा पाेशाख घालताे. लाल गुलाबांचा गुच्छ,कँडल लाइट डिनर, लाइव्ह म्यूझिकवर संथ नृत्य अशी परफे्नट डेट असणारा व जाेडीदाराला उशीर झाला तरी वाट पाहणारा
 
व्यवहारी राेमँटिक : समुद्रकिनारी फिरायला जाऊ असे जाेडीदाराने म्हणताच घरच चांगले म्हणणारा, काेमेजणाऱ्या फुलांवर पैसा का वाया घालवावा असे मानणारा, स्वत:ला आराम वाटेल असे कपडे परिधान करणारा, मूव्ही, डिनर आणि घरी येणे याला डेट समजणारा आणि जाेडीदाराला उशीर लागत असल्यास अजून किती वेळ लागेल असे फाेन करून विचारणारा.
 
सरळ साधा : जाेडीदार म्हणेल तसे वागणारा, फुले घेण्याची गरज आहे का असे विचारणारा, आपल्या आवडीचे जंकफूड हीच डेट मानणारा.जाेडीदार वेळेवर न आल्यास थाेडावेळ वाट पाहून निघून जाणारा.
 
राेमांस म्हणजे काय ?: समुद्रकिनारी फिरायला जाणे फालतू मानणारा, भेटवस्तू देण्याचा कन्सेप्टच न आवडणारा,डेटवर जाणे पसंत नसणारा, परफे्नट डेट म्हणजे काय असे विचारणारा आणि वाट पाहात बसण्यात काय अर्थ असे मानून निघून जाणारा.