तुम्हाला जर बदला घ्यायचा असेल, तर आनंदाने घ्या..

24 Jul 2024 23:52:15
 
 

badla 
 
बदल्याची गाेड भावना बदला घेताना आपल्याला आनंद हाेताे.पण आनंदाची ही जाणीव मानसशास्त्र क्षणिक मानते शिवाय खाेटीही आहे. ्नलीनिकल सायकाेलाॅजीचे जाणकार आणि पीस ऑफ माइंड काॅलमच्या लेखिका कॅरन हाल सांगते की, ‘अनियंत्रित राग व चुकीची प्रतिक्रिया यामुळे आपण स्वत:चे व इतरांचे जास्त नुकसान करून बसताे. जेव्हा नुकसान कारणापेक्षा माेठे हाेते तेव्हा बदल्यातून मिळणारे सुखही नष्ट हाेते. नाती कायमची तुटतात आणि बदल्याचा भाग चालत राहताे.’कसा असावा बदला एंगर स्पेशालिस्ट एंड्रिया ब्रेंडेट सांगते की, स्वत:साठी उभे हाेणे आवश्यक आहे.
 
असे कराही पण बदल्याच्या भावनेसह नव्हे. जखम खाेल असेल तर प्रथम ती बरी हाेण्यासाठी वेळ द्या.’ बाैद्ध गुरू तिक न्यात हन्न म्हणतात, ‘ प्रथम आतील आग शांत करा. त्यानंतर जे कराल ते रागात नव्हे, करुणेने व याेगय बदल्याच्या भावनेने करा.तसेही खूप कमी असे हाेते की जेव्हा आपल्याला बराेबर व चूक स्पष्ट दिसत असते.यासाठी भावनेत वाहू नका, आपल्या कामाने उत्तर द्या. सभ्यता राखा.
 
आजमावून पहा
 
 कामाने स्वत:ला सिद्ध करा. चुकीचे बाेलू नका. सभ्यता राखा.
 पारदर्शी व्हा, कामातही, बाेलण्यातही आणि भावनांच्या पातळीवरही. अपराेक्ष नावे ठेवू नका.
 नेटवर्क वाढवा. जेवढा माेठा परिघ तेवढाच माेठा विचार.
 लाेकांपासून ताेंड फिरवण्यापेक्षा सरळ मुद्यावर बाेला. प्रत्येक गाेष्ट प्रतिष्ठेचा विषय बनवू नका.
 विनाकारण विराेधक हाेणाऱ्यांकडे जास्त लक्ष देऊ नका. गरज असेल तर मदतही करा. अशा लाेकांसाठी एवढे पुरेसे असते.
 मीटिंगमध्ये वा ऑनलाइन जर काेणी कुरघाेडी करण्याच्या प्रयत्नात असेल त्वरित प्रतिक्रिया देऊ नका. यामुळे आपणच चुकीचे ठराल.
 जर एखादा आपल्यावर जळत असेल तर अशा लाेकांशी खासगी गाेष्टी करणे टाळा.
 आपले आराेग्य व मनाेरंजन जपा. राेज व्यायाम करा.
 काही नवे शिका व काम करा
Powered By Sangraha 9.0