आपल्या मेंदूतील माल किती सकारात्मक

23 Jul 2024 23:53:20
 
 
 

brain 
पहिल्या सेवकाचे नाव आहे श्रीयुत विजय आणि दुसऱ्या सेवकाचे नाव आहे श्रीयुत पराजय. विजयाचे काम आहे आपल्या आदेशानुसार सकारात्मक विचारांची निर्मिती करणे आणि पराजयाचे काम आहे आपल्या आदेशानुसार नकारात्मक विचार निर्माण करणे. हे सेवक एवढे निपुण आहेत की, आपल्या इशारे ओळखून वेळ न दवडता आपले काम सुरू करतात.श्री. विजय हा आपण गाेष्टी का करू शकताे? आपण यशस्वी का हाेऊ शकताे.? याचा विशेषज्ञ आहे तर श्री. पराजय सांगताे की, आपण गाेष्टी का करू शकत नाही? का अपयशी हाेऊ शकताे?
 
आपल्याला वाटते की, माझे जीवन का चांगले आहे तेव्हा त्वरित श्री. विजय हे याेग्यप्रकारे सिद्ध करण्यासाठी मेंदूत आपल्याआत्तापर्यंतच्या अनुभवातील सकारात्मक विचार निर्माण करू लागताे. उदा. माझ्याकडे उत्तम कुटुंब आहे, मी किती लाेकांना आवडताे, माझी आर्थिक स्थिती आनंदी राहण्यालायक आहे.इ.याउलट जेव्हा आपण माझे जीवन चांगले का नाही असा विचार करताे तेव्हा त्वरित श्री. पराजय ही गाेष्ट सिद्ध करण्यासाठी मेंदूत नकारात्मक विचार निर्माण करू लागताे. उदा.मी जीवनात काही खास करू शकलाे नाही.माझ्यासाेबत वाईट हाेत असते. इ. हे दाेन्ही सेवक सेवा देतात, आपल्याला काेणाची सेवा हवी हे आपल्यावर अवलंबून असते. लक्षात ठेवा की ज्याला जेवढे काम द्याल तेवढा ताे मजबूत हाेत जाईल आणि एक दिवस फॅ्नटरीचा ताबा घेईल.
Powered By Sangraha 9.0