जिममध्ये जाणाऱ्या युवकांना प्राेटीन पावडर कितपत फायदेशीर ?

    16-Jul-2024
Total Views |
 
 

health 
 
प्राेटीन सप्लीमेंट्स म्हणजे काय? प्राेटीन पावडर हा प्राेटीन सप्लीमेंट्सचा भाग आहे. प्राेटीन सप्लीमेंट हा पूरक आहार आहे.अवाजवी वजन कमी करण्यासाठी उपयुक्त व स्नायूंची बळकटी वाढवणारा समजला जाताे. प्राेटीनचे हे पर्याय तयार करण्यासाठी निरनिराळ्या स्राेतांमधून प्राेटीन घेतले जाते. उदा. वनस्पती (साेयाबीन, मटार, तांदूळ व बटाटे) वा अंडी वा दूध इ. यानंतर या पर्यायात साखर, कृत्रिम सुगंध, व्हिटॅमिन्स आणि खनिज तत्व मिसळले जातात. हे प्राेटीन सप्लीमेंट्स पावडर, शेक वा कॅप्सूल रुपात असतात.यातील प्राेटीन सामान्यत: सप्लीमेंट्समध्ये दाेन प्रकारचे प्राेटीन असतात. वे आणि केसिन. हे दुधातून काढले जातात.
 
हे अमीनाे अ‍ॅसिडचे उत्तम स्राेत असतात. बहुतेक जिम जाणारे तरूण ‘वे’ प्राेटीनचे सेवन करतात. हे एक वेगाने पचणारे प्राेटीन आहे. तसेच केसिन तुलनात्मक रुपात पचण्यास खूप वेळ लागताे. पण ‘वे’ प्राेटीनमध्ये ग्लाेब्यूलर प्राेटीन असते जे शरीराला फायदा कमी आणि नुकसान जास्त देतात.पर्यायांनी हाेणारे नुकसान प्राेटीन सप्लीमेंट्सचे सतत सेवन करणे शरीराचे अनेक नुकसान करू शकते. प्राेटीन पावडर इन्शुलिनची पातळी वाढवू शकते. हे व्यावसायिक रुपात तयार केल्यामुळे यामध्ये काय काय असते हे जाणणे आवश्यक आहे. काही प्राेटीन पावडरमध्ये शिसे, कॅडमियम, आर्सेनिक आणि पाऱ्यासारखे अत्यंत विषारी धातू असतात. यामुळे डाेकेदुखी, थकवा, बद्धकाेष्ठता आणि स्नायू व सांध्यांत वेदना या समस्या हाेऊ शकतात.
  
1. ‘वे’ प्राेटीनमध्ये काही हार्माेन आणि बायाेअ‍ॅ्निटव्ह पेप्टाइड्स असतात जे मुरमांची श्नयता वाढवतात.
 
2. काही ‘वे’ प्राेटीन सप्लीमेंट्समध्ये साखरेच्या रुपात जादा कार्बाेहायड्रेट असतात जे फॅट कमी करण्याऐवजी वाढवतात. जादा खाल्ल्यास हृदयासंबंधित धाेकाही असताे. पाेटासंबधित विकारही उद्भवू शकतात.
 
3. प्राेटीन पावडरींचे सेवन काळासाेबत ऑस्टियाेपाेराेसिस (हाडांमध्ये ठिसूळपणा) आणि किडनीसंबंधित त्रास निर्माण करू शकताे.
 
4. या सप्लीमेंट्सचा वापर करणारे लाेक याच्या सेवनाच्या इतर पाॅइंट्सवर लक्ष देत नाहीत. उदा.पाण्याचे याेग्य प्रमाण, व्हिटॅमिन, खनिज घटक आणि फायबरचे याेग्य प्रमाणात सेवनही शारीरिक आराेग्य राखण्यासाठी महत्त्वाचे आहे.बरेच तरूण इतरांचा सल्ला ऐकून प्राेटीन पावडरचे सेवन सुरू करतात, पण हे अजिबात सुरक्षित आणि प्रभावी नाही. खरे तर प्राेटीन पावडरमध्ये सारे आवश्यक पाैष्टिक घटक नसतात जे संतुलित आहारपूर्ण करण्यासाठी आवश्यक असतात. यासाठी हे अत्यंत मर्यादित प्रमाणातच घ्यायला हवे आणि काेणतीही प्राेटीन पावडर घेण्यापूर्वी डाॅ्नटरांचा सल्ला अवश्य घ्यायला हवा.