जमिनीचे नुकसान टाळण्यासाठी नैसर्गिक शेती करणे आता गरजेच

    16-Jul-2024
Total Views |
 
 
 

Farming 
अन्न ही प्रत्येक सजीवाची मूलभूत गरज आहे आणि ती शेतीतून पूर्ण हाेते.विभाग आणि हवामानानुसार पिके घेतली जातात. सध्याच्या काळात पिकांचे उत्पादन वाढावे म्हणून खते वापरली जातात.काही खतांमुळे जमिनीचा कस खालावत असल्याने नैसर्गिक शेती (नॅचरल फार्मिंग) हा एक पर्याय सुचविला जाताे. केंद्र सरकार त्याचा विचार करत असले, तरी अशा शेतीच्या व्यवहार्यतेचा प्रश्न आहे. वैज्ञानिक संशाेधन संस्थाही पूर्णपणे नैसर्गिक शेतीस अनुकूल नाहीत. या शेतीतून पुरेसे उत्पादन आणि फायदे मिळण्यासाठी सिंचनाची पुरेशी साेयही करावी लागेल.अमेरिकेनंतर जिरायती जमिनीचे प्रमाण सर्वांत जास्त असलेला भारत हा दुसऱ्या क्रमांकावरील देश आहे.
 
कमाल दाेन हे्नटर जमीन असलेले लहान आणि किरकाेळ शेतकरी (एकूण शेतकऱ्यांमध्ये 86 टक्के) 46 टक्के जमिनीवर लागवड करतात, तर दाेन ते 10 हे्नटर जमीन असलेले मध्यम शेतकरी (13 टक्के) 44 टक्के जमिनीवर लागवड करतात. आपल्याकडील सुमारे पन्नास टक्के जिरायती जमीन पावसावर अवलंबून आहे आणि सुमारे साठ टक्के शेतकरी अशा प्रदेशात राहतात. तेलबिया, भरड धान्ये, डाळी आणि कापसाची लागवड ते करतात. भूगर्भातील पाणी (65 टक्के) हा सिंचनासाठी आणि पिण्यासाठी (85टक्के) मुख्य स्राेत आहे. मात्र, हवामानातील बदल आणि भूगर्भातील पाण्याच्या घटत्या पातळीमुळे हा शाश्वत पर्याय राहू शकत नाही. या स्थितीत पावसावर अवलंबून असलेल्या भागात सूक्ष्म खतांचा (नॅनाे फर्टिलायझर्स-एनएफ) विचार करावयास हवा.
 
त्या मुळे पर्यावरणातील बदलांना सामाेरे जाण्याची पिकांची क्षमता वाढते, त्यांना चांगले पाेषण मिळते.देशात हरितक्रांती यशस्वी झाली, तरी आता तिचा प्रभाव उरलेला नाही.आपल्या अन्नातील पाैष्टिकता कमी हाेत आहे आणि अन्नातील रासायनिक घटक वाढत आहेत. आपल्या दाेन तृतीआंश जिरायती जमिनीचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. हवामानातील बदलांचा फटका धान्याेत्पादनाला बसायला लागला आहे.सुदैवाने भारतात ‘एनएफ’च्या यशस्वी वापराची अनेक उदाहरणे आहेत. मात्र, त्यासाठी खर्च माेठा असल्याने विचारानंतरच निर्णय करावा लागेल.