डच अभियंत्यांनी बनविली 180 फूट लांबीची सायकल

    16-Jul-2024
Total Views |
 
 


Dutch
 
जगातील सर्वांत लांब सायकल नेदरलँड्समध्ये तयार करण्यात आली आहे. आठ डच अभियंत्यांनी तयार केलेली ही सायकल 180 फूट 11 इंच लांबीची आहे. या पूर्वी सर्वांत लांब सायकल ऑस्ट्रेलियातील बर्नी रायन यांनी 2020मध्ये तयार केली हाेती आणि ती 155 फूट 8 इंच लांबीची हाेती. डच अभियंत्यांनी तयार केलेली ही नवीन सायकल वापरता येत असली, तरी तिच्या प्रचंड लांबीमुळे ती शहरांमध्ये चालविणे श्नय नाही.मात्र, तिची नाेंद ‘गिनीज वर्ल्ड रेकाॅर्ड्स’मध्ये झाली आहे. इव्हान श्लाक (वय 39 वर्षे) या अभियंत्याच्या मार्गदर्शनाखाली आठ जणांनी ही सायकल तयार केली. ‘मी लहानपणापासून अशी सर्वांत लांब सायकल तयार करण्याचे स्वप्न बघत हाेताे.
 
गिनीज बुक चाळल्यावर अशी सायकल तयार करण्याचा माझा निश्चय पक्का झाला आणि आम्ही तिची निर्मिती केली,’ असे इव्हान यांनी सांगितले. ते राहत असलेल्या प्रिन्सेनबिक या गावात ही सायकल तयार करण्यात आली.सर्वांत जास्त लांबीची सायकल तयार करण्याचे प्रयत्न पूर्वीही झाल्याचे ‘गिनीज’मधील नाेंदींवरून दिसते. गेल्या साठ वर्षांत असे प्रयत्न झाले आहेत. 1965मध्ये जर्मनीतील काेलाेन या शहरात 8 मीटर (26 फूट 3 इंच) लांबीची सायकल तयार करण्यात आली हाेती.न्यूझीलंड, इटली, बेल्जियम, ऑस्ट्रेलिया आणि नेदरलँड्समध्येसुद्धा अशा लांब सायकली तयार करण्यात आल्याचे उल्लेख आहेत.