रोजगार विभागाच्या निर्णयांच्या पुस्तिकेचे प्रकाशन

10 Jul 2024 13:23:21
 
 
roj
मुंबई, 9 जुलै (आ.प्र.) :
 
कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागामार्फत गेल्या दोन वर्षांत राबवण्यात आलेल्या विभागाच्या विविध उपक्रमांची व योजनांची माहिती देणाऱ्या ‌‘कौशल्ययुक्त महाराष्ट्र, रोजगारयुक्त महाराष्ट्र' या माहितीपुस्तिकेचे प्रकाशन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, कौशल्य रोजगार उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते आणि मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांच्या हस्ते उपस्थितीत करण्यात आले. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ‌‘देशाचा विकास गतीने होण्यासाठी प्रत्येक क्षेत्रात अनुभवी, कार्यक्षम, सर्जनशील कुशल मनुष्यबळाची अत्यंत आवश्यकता आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी युवा पिढीला कौशल्ययुक्त बनवण्यासाठी कौशल्य विकासाच्या उपक्रमांना प्राधान्य दिले आहे.
 
कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभातलोढा यांनी कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून सर्व विभागांतील अधिकाऱ्यांना सोबत घेऊन सातत्याने नावीन्यपूर्ण उपक्रम सुरू करून रोजगारनिर्मितीसाठी प्रभावी अंमलबजावणी केली, याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिर, आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र, कौशल्य विद्यापीठाची स्थापना, स्वामी विवेकानंद आंतरराष्ट्रीय कौशल्य विकास प्रबोधिनी, ग्रामीण भागात 511 प्रमोद महाजन ग्रामीण व कौशल्य विकास केंद्र सुरू करण्यात आली आहेत. यासह पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा व नमो महारोजगार मिळावा असे विविध उपक्रम विभागाच्या माध्यमातून राबविण्यात आले आहेत. राज्यातील युवकांना जास्तीत जास्त रोजगार निर्माण होऊन राज्याच्या विकासाला गती मिळेल.'
Powered By Sangraha 9.0