दिल्ली-हावडा मार्गावर प्रयागराज मार्गे पहिली ‘स्लिपर वंदे भारत

    22-Jun-2024
Total Views |
 
 
 


train
 
 
’दिल्ली-हावडा मार्गावर प्रयागराज मार्गे देशातील पहिली ‘स्लिपर वंदे भारत ए्नस्प्रेस’ लवकरच धावायला लागेल.पहिली ‘वंदे भारत’ रेल्वेगाडी प्रयागराज मार्गेच धावली हाेती.निम वेगवान ‘वंदे भारत’ गाड्या अनेक मार्गांवर सुरू झाल्या असल्या, तरी त्यात शयनयानाचे (स्लिपर) डबे नसतात. ती साेय आता ‘स्लिपर वंदे भारत’मध्ये केलेली असून, दिल्ली-हावडा मार्गावर अशी पहिली गाडी लवकरच धावेल. या दाेन्ही शहरांतील अंतर 1,451 किलाेमीटर असून, ही गाडी ते बारा तासांत पार करेल. या मार्गावरून धावणाऱ्या राजधानी ए्नस्प्रेसला सध्या हे अंतर कापण्यासाठी 17 तास लागतात.
 
नव्या ‘स्लिपर वंदे भारत’मुळे पाच तासांचा वेळ कमी हाेईल.दिल्ली-प्रयागराज-हावडा या मार्गावरील विविध विभागांत ताशी 90 ते 130 किलाेमीटरच्या वेगाने गाड्या धावतात आणि ताशी 130 किलाेमीटरच्या वेगाने जाणारी राजधानी ए्नस्प्रेस ही सध्या सर्वांत जलद गाडी आहे. दिल्ली-हावडा मार्गाचा माेठा भाग उत्तर मध्य रेल्वेच्या प्रयागराज मंडळातून जाताे. ताशी 160 किलाेमीटरच्या वेगाने गाड्या चालविता येण्यासाठी या मार्गाचे आधुनिकीकरण सध्या केले जात आहे. आगामी दाेन महिन्यांत ‘स्लिपर वंदे भारत’ सुरू करण्याचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी जाहीर केले आहे. रेल्वे मंडळाने मंजुरी दिल्यावर ही गाडी धावायला लागेल.