दिव्यांग शिक्षकांच्या समायाेजनासाठी शासन सकारात्मक : देवेंद्र फडणवीस

    22-Jun-2024
Total Views |
 
 

CM 
 
दिव्यांग विद्यार्थ्यांमध्ये न्यूनगंडाची भावना येऊ न देता शिकवणे जिकिरीचे काम आहे. नवीन शैक्षणिक धाेरणातही या बाबीचे महत्त्व अधाेरेखित केले आहे. राज्यातील दृष्टीहीन व दिव्यांग शिक्षकांच्या समायाेजनासाठी शासन सकारात्मक असून, याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमाेर आणावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.राष्ट्रीय दृष्टीहीन संघाच्या निवेदनाच्या अनुषंगाने फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथिगृहात बैठक झाली.
 
बैठकीस शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, शालेय शिक्षण विभागाच्या प्रधान सचिव आय. ए.कुंदन, दिव्यांग कल्याण विभागाचे प्रधान सचिव सुमंत भांगे, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव श्रीकर परदेशी, दिव्यांग कल्याण आय्नत प्रवीण पुरी, शिक्षण आयु्नत सूरज मांढरे, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे प्रकल्प संचालक (समग्र शिक्षा) प्रदीपकुमार डांगे, शालेय शिक्षण विभागाचे उपसचिव समीर सावंत, तुषार महाजन, राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्र, शिक्षक परिषदेचे पदाधिकारी उपस्थित हाेते.
 
शासन निर्णयाप्रमाणे या शिक्षकांना वाहतूक भत्ता द्यावा. टाटा सामाजिक संस्थेने प्रति विद्यार्थ्यांमागील शिक्षक व दिव्यांगत्वाच्या प्रकारानुसार आवश्यक असलेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शिक्षक देण्याचा सविस्तर अहवाल तयार केला आहे. दिव्यांग शिक्षकांच्या समायाेजनासाठी शासनाची सकारात्मक भूमिका असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. या प्रसंगी शिक्षकांच्या अन्य विषयांबाबतही चर्चा करण्यात आली.