अतिचहा पिणे ायद्यापेक्षा दुप्पट हानिकारक

20 Jun 2024 23:10:03
 
 

tea 
 
चहाच्या एका कपात सुमारे एक ग्रॅम कॅीन आढळते.जर एखादी व्यक्ती चार-पाच कप चहा राेज पित असेल, तर राेज 4-5 ग्रॅम प्रमाणात कॅीन नावाचे विष त्याच्या पाेटात जात असते. यामुळे लवकरच ती व्यक्ती नाडी दुर्बलतेमुळे, भूक न लागणे, थरथर जाणवणे व इंद्रिये निष्क्रिय झाल्यामुळे अशक्तपणाची शिकार हाेत असते.चहात आढळणारे उत्प्रेरक तत्त्व मानवी मेंदूच्या ज्ञानतंतूंवर प्रतिकूल परिणाम टाकून इंद्रियांना सुप्त करते.कॅीनमुळे झाेप कमी झाल्यामुळे मानसिक राेगांचा जन्म हाेत असताे. टॅनिन घटकाचा थर पित्ताशयात साठल्यामुळे पाचक रसांचा स्राव बंद हाेत असताे.चहात थाेड्या प्रमाणात व्हिटॅमिन बी व प्राेटीन आढळते.या दाेन्ही घटकांचे प्रमाण एवढे कमी असते, की ते आपला उत्तम प्रभाव पाडू शकत नाहीत. त्वचा काेरडी पडणे व त्वचा कडक हाेणे चहाचेच दुष्परिणाम आहेत.
 
सकाळी रिकाम्या पाेटी चहा पिणे आराेग्यासाठी हानिकारक असते. चहासाेबत हलकाफ ुलका नाश्ता अवश्य घ्यायला हवा. चहात दूध जास्त व चहापावडर कमी करूनही चहाचा विषारीपणा कमी करता येऊ शकताे. निद्रानाश, यकृताचे राेगी, वायूचे राेगी, आम्लपित्ताचे व पचनासंबंधित राेग्यांनी चहा पिऊ नये. चहाने रक्तक्षीणता वाढते, यकृत कमकुवत हाेते आणि वीर्य पातळ हाेते. संधिवाताच्या रुग्णांसाठीही चहा हानिकारक असताे. कारण चहामुळे लघवीत अ‍ॅसिड वाढते व त्यामुळे सांध्यावर सूज येत असते.
चहाचे दुष्परिणाम टाळण्यासाठी शक्यताे बाजारातील चहा पिऊ नये. जर एखाद्याच्या आग्रहामुळे चहा घ्यायचा असेल, तर अर्ध्या कपापेक्षा जास्त चहा कधीही घेऊ नये. चहासाेबत बिस्किटे वा फरसाण इ. काही हलके खाद्यपदार्थ अवश्य घ्यावेत. चहा जास्त गरम वा माेठमाेठे घाेट घेऊन पिणेही हानिकारक असते. चहाची सवय साेडण्यासाठी हळूहळू चहापावडरचे प्रमाण कमी करीत दुधाचे प्रमाण वाढवीत जायला हवे. चहा प्याल्यामुळे काेणताही ायदा हाेत नाही, उलट कैकपटीने ताेटे आहेत. आराेग्याच्या रक्षणासाठी चहा ि0पणे टाळायला हवे.
Powered By Sangraha 9.0