रोजगारनिर्मितीसाठी बचत गटांकडूनगणवेश शिलाई : आदिती तटकरे

18 Jun 2024 13:55:41
 
ro
 
मुंबई, 17 जून (आ.प्र.) :
 
महिलांना रोजगार उपलब्ध होऊन आर्थिक लाभ मिळावा, यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळाच्या (मविम) बचत गटांकडून शाळेचे गणवेश शिवून घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. याची प्रभावी अंमलबजावणी सुरू झाल्याचे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले. केंद्राच्या समग्र शिक्षा कार्यक्रमांतर्गत शासकीय; तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांतील 1 ली ते 8 पर्यंत शिक्षण घेत असलेल्या सर्व मुली, अनुसूचित जाती व अनुसूचित प्रवर्गातील मुले; तसेच दारिद्र्‌‍य रेषेखालील पालकांच्या मुलांना मोफत गणवेश योजनेचा लाभ देण्यात येतो. गणवेश शिलाईचे काम देण्यापूर्वी गावाचे मॅपिंग करण्यात आले. तसेच महिलांची संख्या निश्चित करण्यात आली. महिला दिवसाला किती गणवेश शिवतात, याची संख्या काढून त्यानुसार गणवेशसंख्या देण्यात आली आहे. आता शाळा सुरू झाल्या असून, राज्यभरात गणवेश वाटपही सुरू झाल्याचे तटकरे यांनी सांगितले.
Powered By Sangraha 9.0