स्थूलतेमुळे वाढताेय 13 प्रकारच्या कॅन्सरचा धाेका

14 Jun 2024 11:31:31
 
 

health 
संशाेधक वैज्ञानिकांचे म्हणणे आहे की, स्थूलतेमुळे शरीरात मेटाबाॅलिकसंबंधित (पचनक्रिया) गडबडीमुळे प्रतिकारप्रणाली शरीरात निर्माण झालेल्या कॅन्सर पेशींच्या उन्मूलनात अडथळा आणत असते.यामुळे शरीरात कॅन्सरच्या विकासाला प्राेत्साहन मिळते.नार्वेच्या संशाेधकांना आढळले की, स्थूलता फक्त टाइप टू मधुमेहासारख्या आजाराची जाेखीम वाढवत नाही, तर ही अनेक ऑटाेइम्यून आजारांचीही यजमान असते. ज्यामध्ये काेविड-19 सारखे संक्रमक राेग व कॅन्सरही सामील आहेत.संशाेधनात आढळले आहे की, कॅन्सरचा 15 टक्के रुग्णांचे वजन मानकापेक्षा जास्त असते.
 
हेही दिसून आले आहे की,स्थूलता कमीत कमी 13 प्रकारच्या कॅन्सरसाठी एक मुख्य जाेखीमकारक आहे. हे स्तन कॅन्सर, गर्भाशय कॅन्सर, मुख कॅन्सर, प्राेस्टेट कॅन्सर, लंग कॅन्सर आणि ब्लड कॅन्सर इ. आहेत.जागतिक आराेग्य संघटनेने नुकतेच सांगितले आहे की, गेल्या दाेन दशकांत जगात स्तन कॅन्सरचे रुग्ण सर्वाधिक झाले आहेत. पूर्वी जगात जास्त पीडित रुग्ण फुफ्फुसाच्या कॅन्सरचे हाेते, पण आता स्तन कॅन्सर जास्त गंभीर आजाराच्या रूपात समाेर आला आहे. जगात भारत स्थूलतेबाबत पुरुषांमध्ये पाचव्या, तर स्त्रियांमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे, तसेच जागतिक आराेग्य संघटनेनुसार, दहापैकी एका भारतीयाला कॅन्सर, तर 15 पैकी एकाचा मृत्यू कॅन्सरमुळे हाेताे.
Powered By Sangraha 9.0