भारतात ब्रेन ट्यूमरच्या दरवर्षी 30 हजारांहून अधिक केसेस

14 Jun 2024 11:26:01
 
 


brain
 
राेज सकाळी उठल्यावर तुम्हाला नियमित डाेकेदुखी हाेत असेल, तुम्हाला विचार करण्यात, बाेलण्यात, शब्द शाेधण्यात त्रास हाेत असेल, तर तुम्हाला सतर्क राहावे लागेल. कारण, हे ब्रेन ट्यूमरचे लक्षण असू शकते.भारतात दरवर्षी ब्रेन ट्यूमरची सुमारे 30 हजार प्रकरणे नाेंदवली जातात.मेंदूतील असामान्य पेशींचा संग्रह किंवा वस्तुमान याला ‘ब्रेन ट्यूमर’ म्हणतात. ब्रेन ट्यूमर कर्कराेगजन्य किंवा कर्कराेग नसलेला असू शकताे.कर्कराेगाची गाठ वाढत असताना, कवटीच्या आत दाब वाढू शकताे.यामुळे मेंदूचे नुकसान हाेऊ शकते तसेच जीवघेणे देखील हाेऊ शकते. ्रेन ट्यूमरचे विविध प्रकार आहेत.ज्यामध्ये प्राथमिक मेंदूचा कर्कराेग उद्भवताे. या मेंदूच्या सभाेवतालच्या पडद्यासारख्या मेंदूच्या पेशी आहेत, याला ‘मेनिन्जेस’ म्हणतात आणि पिट्यूटरी किंवा पाइनल सारख्या मज्जातंतू पेशी असतात. प्राथमिक कर्कराेग साैम्य किंवा कर्कराेगजन्य असू शकताे. ग्लिओमा आणि मेनिन्जिओमेम्ब्रेन ट्यूमर सहसा प्राैढांमध्ये आढळतात.
 
भारतात ब्रेन ट्यूमर अधिकतर मुले आणि प्राैढ या दाेघांमध्ये आढळतात.मेडुलाेब्लास्टाेमासारख्या विशिष्ट प्रकारचे ब्रेन ट्यूमर मुलांमध्ये अधिक प्रमाणात निदान केले जातात. जागतिक स्तरावर मुलांमध्ये कर्कराेगाशी संबंधित मृत्यूचे दुसरे प्रमुख कारण आहे.
याबाबत अहमदाबाद सिव्हिल हाॅस्पिटलच्या न्यूराेसर्जरी विभागाचे प्राध्यापक-प्रमुख डाॅ. जमिन शाह म्हणतात की, आजच्या जीवनशैलीत डाेकेदुखी ही एक सामान्य समस्या बनली आहे; पण जर ही वेदना सतत आणि विशेषत: नियमितपणे सकाळी लवकर हाेत असेल, तर लवकरात लवकर सुपरस्पेशालिस्टचा सल्ला घेणे अत्यावश्यक आहे. ब्रेन ट्यूमर ही एक गंभीर आराेग्य स्थिती आहे.वेळेवर निदान आणि याेग्य उपचार केल्यास दीर्घायुष्य मिळू शकते.सिव्हिल हाॅस्पिटलमध्ये गेल्या दाेन वर्षांत ब्रेन ट्यूमरच्या रुग्णांमध्ये 10 ते 15 टक्के वाढ झाली आहे. माेबाईलच्या अतिवापरामुळे ब्रेन ट्यूमरचे प्रमाण वाढले आहे, असे अनेकांचे मत आहे; परंतु हे अद्याप सिद्ध झालेले नाही. न घाबरता वेळीच उपचार केल्यास ब्रेन ट्युमर लवकर बरा हाेऊ शकताे.
Powered By Sangraha 9.0