सोमेश्वर फाउंडेशनतर्फे विक्रमी 1069 जणांचे रक्तदान

11 Jun 2024 14:19:43
 
 
som
पुणे, 10 जून (आ.प्र.) :
 
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त सोमेश्वर देवस्थान, सोमेश्वर फाउंडेशन, विठ्ठल सेवा मंडळ यांच्या माध्यमातून सोमेश्वर मंदिर, सोमेश्वरवाडी, पाषाण (पेठ जिजापूर) या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन माजी नगरसेवक सनी निम्हण यांनी रविवारी (ता.9 जून) केले होते. शिबिराचे उद्घाटन सोमेश्वर ट्रस्टचे अध्यक्ष पोपटराव जाधव, गोविंद रणपिसे, मनोहर आरगडे, वाडेेशर सुतार, उमेश वाघ, पत्रकार संघाचे अध्यक्ष बाबा तारे, ज्ञानेेशर पारखे यांच्या हस्ते करण्यात आले.
 
आयोजक, माजी नगरसेवक सनी निम्हण म्हणाले, ‌‘आजपर्यंत या ठिकाणी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराच्या तुलनेत या वर्षी 1069 एवढे विक्रमी रक्त संकलन झाले. पुणे शहर व जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने, शिवराज्याभिषेक दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, यामुळे अनेकांचे प्राण वाचतील. ‌‘नातं रक्ताचं शिवभक्तांचं' हे ब्रीदवाक्य घेऊन दरवर्षी शिबिराचे आयोजन करण्यात येते. दरवर्षी मागील वर्षाच्या तुलनेत रक्तदानासाठी शिवभक्तांचा वाढता सहभाग दिसून येतो. या मधून सामाजिक जाणीव रूजत असल्याचे दिसून येते.' रक्त संकलन ‌‘अक्षय रक्त केंद्रा'च्या माध्यमातून करण्यात आले. यावेळी औंध विश्वस्त मंडळाचे राहुल गायकवाड, योगेश जुनवणे, महेंद्र जुनवणे, गिरीश जुनवणे, हेरंभ कलापुरी, सुप्रीम चोंदे, माजी स्वीकृत नगरसेवक वसंतराव जुनवणे, शिवम दळवी, माजी महापौर दत्तात्रेय गायकवाड यांच्यासह शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0