आमीरने नाटक गमावलं, स्टारडम कमावल

04 May 2024 23:42:51
 
 

amir 
आमीर खान ि फल्मी कुटुंबातला असला, तरी त्याने सिनेमांमध्ये येऊ नये, असं त्याच्या घरातल्यांचं मत हाेतं. तरीही ताे काॅलेजात नाटक करण्याचा प्रयत्न करत हाेता. हिंदीत संधी नाही मिळाली, तर गुजराती नाटकात शिरकाव करून घेतला. समाेर मुख्य पात्रं नाटक रंगवत असताना मागे एक समूह गाणं म्हणायचा, त्यात ताे हाेता, एक संवादही हाेता.पहिला प्रयाेग तीनचार दिवसांवर आलेला असताना नेमका एक दिवस काेणीतरी महाराष्ट्र बंद पुकारला.आमीरच्या आईने सांगितलं तू बसने जाताेस, दगडफेक वगैरे झाली तर काय करशील? आज नकाे जाऊस तालमीला. दुसऱ्या दिवशी दिग्दर्शकाने आमीरला नाटकातून काढून टाकलं.
 
आमीर काॅलेजच्या बागेत अश्रू आवरत बसला हाेता. तेव्हा दाेन मित्र त्याला शाेधत आले आणि म्हणाले, ‘पुण्यातल्या फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये एका विद्यार्थ्याला एक डिप्लाेमा फिल्म करायची आहे, त्यात तुझ्यासाठी राेल आहे. तू फ्री आहेस का?’ आमीर म्हणाला, ‘हाे, आत्ताच फ्री झालाेय.’ त्याने ताबडताेब पुण्याला जाऊन ती व्यक्तिरेखा साकारली. ती फिल्म पाहून दुसऱ्या एका स्टुडंटने त्याच्या फिल्ममध्ये आमीरला घेतलं. ती फिल्म पाहून केतन मेहताने आमीरला हाेली या त्याच्या सिनेमात घेतलं आणि हाेली पाहून आमीरच्या काकांनी त्याला ब्रेक द्यायचं ठरवलं कयामत से कयामत तकमधून!
Powered By Sangraha 9.0