माेबाइलमुळे कमी झाला पालक-मुलांमधील संवाद

22 May 2024 19:01:32
 
 



thoughts
 
माेबाइलच्या आहारी जाण्यामुळे मुलांची आई-वडिलांबराेबरची जवळीक कमी हाेते आहे. माेबाइलच्या स्क्रीनवर जास्त वेळ असलेल्या मुलांचा पालकांबराेबर संवादही कमी हाेत असल्याचे एका लेखात नमूद करण्यात आले आहे.‘जामा पिडिअ‍ॅट्र्निस’मधील लेखानुसार, माेबाइलवर जास्त वेळ असलेली मुले कमी बाेलतात आणि त्यांचे काेणाचे म्हणणे ऐकण्याचे प्रमाणही कमी असते. माेबाइल पाहताना सतत बसल्यामुळे ही मुले लठ्ठ हाेतात तसेच त्यांच्यात औदासीन्याचे प्रमाण वाढते आणि केवळ पालकांपासूनच नव्हे, तर अन्य नातलगांपासूनसुद्धा ही मुले दुरावतात.मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी घरात सुसंवादाचे वातावरणही आवश्यक असते.
 
पालकांचा मुलांबराेबर जेवढा संवाद जास्त असेल, तेवढा मुलांचा सामाजिक विकास चांगला हाेऊन मेंदूची कार्यक्षमताही वाढते. 18 महिने वयाचे आणि स्क्रीनपुढे जास्त वेळ असलेले मूल 1.3 शब्द कमी बाेलते.सरासरी 2 तास 52 मिनिटे स्क्रीनपुढे असलेले तीन वर्षांचे मूल 4.9 शब्द कमी बाेलत असल्याचेही आढळले आहे. ऑस्ट्रेलियाचा दक्षिण, पश्चिम भाग तसेच क्विन्सलँडमधील 220 कुटुंबांचा अभ्यास करून संशाेधकांनी हा निष्कर्ष काढला आहे. आई-मूल यांच्यातील संवादांचे रेकाॅर्डिंग करून ही माहिती घेतली गेली.माेबाइलच्या आहारी जाण्याचे प्रमाण भारतीय मुलांमध्येही वाढत असून, आपल्याला हा फाेन न मिळाल्यास आपण बेचैन हाेत असल्याचे 91 टक्के मुलांनी कबूल केले. ऑनलाइन इन्फ्लुएसर्सचे आयुष्य पाहून नैराश्य येणाऱ्या मुलांचे प्रमाण 89 टक्के असल्याचे ‘सायबर मीडिया’ या संस्थेच्या अभ्यासात आढळले. माेबाइलमुळे पालक आणि मुलांमधील दुरावा वाढत असल्याचेही त्यात म्हटले आहे.
Powered By Sangraha 9.0