निवडणूक शांततेत पार पाडण्याचे आवाहन

20 May 2024 00:02:56
 

Elections
लाेकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात नाशिक जिल्ह्यातील दिंडाेरी व नाशिक लाेकसभा मतदारसंघात साेमवारी (20 मे) मतदान हाेत असून, निवडणूक आयाेगाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकाेर पालन करत निवडणूकप्रक्रिया शांततापूर्ण, मु्नत आणि निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चाे्नकलिंगम यांनी दिले.नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात नाशिक व दिंडाेरी लाेकसभा मतदारसंघ निवडणूकविषयक आढावा बैठकीत ते बाेलत हाेते.
जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी तथा नाशिक लाेकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी जलज शर्मा, नाशिकचे आयु्नत डाॅ. अशाेक करंजकर, पाेलीस आयु्नत संदीप कर्णिक, जिल्हा पाेलीस अधीक्षक विक्रम देशमाने, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तथा ‘स्वीप’च्या नाेडल अधिकारी आशिमा मित्तल, अप्पर जिल्हाधिकारी तथा दिंडाेरी लाेकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी बाबासाहेब पारधे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, उपजिल्हा निवडणूक अधिकारी डाॅ.शशिकांत मंगरूळे यांच्यासह सर्व विधानसभा मतदारसंघांचे निवडणूक अधिकारी, नाेडल अधिकारी उपस्थित हाेते.मतदान केंद्रे आवश्यक साेयीसुविधांनी सज्ज ठेवावीत, त्याबाबत मतदारांत पुरेशी जनजागृती करावी.
दिव्यांग मतदारांना सुलभपणे मतदान करता यावे, यासाठी आवश्यक सुविधा द्याव्यात, एकाच ठिकाणी एकापेक्षा जास्त मतदान केंद्रे असलेल्या ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी मतदारांसाठी प्रतीक्षा कक्षाची व्यवस्था करावी, असे चाे्नकलिंगम यांनी स्पष्ट केले.जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी सादरीकरणाद्वारे जिल्ह्यातील निवडणूक तयारीची माहिती दिली. पाेलीस आयु्नत संदीप कर्णिक आणि पाेलीस अधीक्षक (ग्रामीण) विक्रम देशमाने यांनी पाेलीस विभागाने केलेल्या तयारीची माहिती दिली. दरम्यान, बैठकीपूर्वी चाे्नकलिंगम यांनी केंद्रीय वखार महामंडळाच्या गाेदामास भेट देऊन स्ट्राँगरूम व मतमाेजणीसाठी करण्यात आलेल्या नियाेजनाची माहिती घेतली.
 
 
Powered By Sangraha 9.0