भ्रष्टाचाराचे प्रमाण गेल्या पाच वर्षांत वाढल्याचे 55 ट्नके लाेकांचे मत

19 May 2024 23:28:54
 
 


corruption
 
 
 
लाेकसभा निवडणुकीच्या प्रचारात सगळे राजकीय पक्ष एकमेकांवर भ्रष्टाचाराचा आराेप करत आहेत. मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी हा मुद्दा राजकीय पक्षांना महत्त्वाचा वाटत असला, तरी भ्रष्टाचाराचे प्रमाण वाढल्याचे सर्व थरांतील लाेकांचे मत असल्याचे नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे.सर्वेक्षणाला प्रतिसाद देणाऱ्या दर दहापैकी सहा जणांनी भ्रष्टाचार वाढल्याचे मत व्य्नत केले.सत्तारूढ आणि विराेधक यासंदर्भात एकमेकांवर आराेप करत असले, तरी भ्रष्टाचार वाढला असून, त्याला केंद्र आणि राज्य सरकारे जबाबदार असल्याचे मतदार म्हणत आहेत.गेल्या पाच वर्षांत ताे वाढल्याचे 55 ट्नके प्रतिसादकर्ते म्हणतात. मतदानापूर्वी झालेल्या सर्वेक्षणातील हे निष्कर्ष आहेत.लाेकनिती-सीएसडीएस’ या संस्थेने 2019मध्ये असेच सर्वेक्षण केले हाेते.
 
तेव्हाच्या तुलनेत असे मत व्य्नत करणाऱ्यांची संख्या 15 ट्न्नयांनी वाढल्याचे दिसते.भ्रष्टाचार कमी झाल्याचे मत व्य्नत करणारे 24 ट्नकेआहेत. 2019मध्ये हे प्रमाण 37 ट्नकेहाेते. म्हणजेच भ्रष्टाचार कमी झाल्याचे वाटणाऱ्यांची संख्या कमी झालेली दिसते.खेडी, लहान गावे आणि माेठ्या शहरांत हे सर्वेक्षण झाले. खेडी, गावे अथवा शहरे असे काेठेही राहणारे असले, तरी गेल्या पाच वर्षांत भ्रष्टाचार वाढल्याबाबत प्रतिसादकर्त्यांत मतै्नय असल्याचे दिसते.प्रतिसादकर्त्यांपैकी जेमतेम एक पंचमांश जणांना भ्रष्टाचार कमी झाल्याचे वाटते. प्रतिसादकर्त्यांची आर्थिक पार्श्वभूमी वेगवेगळी असली, तरी भ्रष्टाचार वाढल्याचे बहुसंख्यांचे मत आहे. गेल्या पाच वर्षांत भ्रष्टाचार वाढल्याचे गरीब आणि श्रीमंतांतील दर दहापैकी सहाजण म्हणतात. उच्च उत्पन्न अथवा श्रीमंत वर्गातील सात ट्न्नयांना भ्रष्टाचार कमी झाल्याचे वाटते.वाढत्या भ्रष्टाचाराला जबाबदार काेण, या प्रश्नावर 56 ट्नकेप्रतिसादकर्त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारांना जबाबदार धरले. त्यातही जास्त जबाबदार काेण, या प्रश्नावर केंद्र सरकारला जबाबदार धरणारे प्रतिसादकर्ते जास्त हाेते.
Powered By Sangraha 9.0