घाेरण्यामुळे पाश्चात्त्य देशांत घटस्फाेट वाढले

15 May 2024 23:35:45

 
sleep
झाेपेशिवाय काेणत्याही सजीवाचे चालणार नाही.दिवसभराच्या धावपळीने थकलेल्या शरीराला विश्रांतीसाठी निसर्गाने झाेपेची याेजना केली आहे. पण, ती शांतपणाने मिळाली तर ठीक; नाही तर दुसरा दिवस त्रासदायक ठरताे.झाेपेत व्यत्यय येण्याचे एक कारण आहे घाेरणे (स्नाेरिंग).जाेडीदारांपैकी एक जण घाेरणारा असेल, तर दुसऱ्याला व्यवस्थित झाेप मिळत नाही आणि त्यातून दांपत्यांमध्ये वाद वाढून प्रकरण घटस्फाेटापर्यंत जाते. ‘अमेरिकन अ‍ॅकॅडमी ऑफ स्लीप मेडिसिन’ने दिलेल्या माहितीनुसार, त्या देशात घाेरणे हे घटस्फाेटाचे तिसरे महत्त्वाचे कारण झाले आहे. विवाहबाह्य संबंध या पहिल्या आणि आर्थिक या दुसऱ्या कारणानंतर घटस्फाेटाचा क्रमांक येताे. ‘एमएसडी मॅन्युअल्स’च्या अहवालानुसार, जगभरात सुमारे 57 टक्के पुरुष आणि 40 टक्के महिला घाेरतात. भारताचा विचार केला, तर 43 टक्के अधूनमधून आणि 20 टक्के लाेक नियमितपणे घाेरत असल्याचेदिसले आहे. जागतिक लाेकसंख्येपुढे घाेरण्याची समस्या माेठ्या प्रमाणात असून, पाश्चात्त्य देशांत यामुळे घटस्फाेटांपर्यंत वेळ आल्याचे आकडेवारीतून दिसते.
घटस्फाेटांचे प्रमाण भारतात कमी असले, तरी घाेरण्यामुळे नातेसंबंधांवर परिणाम निश्चितच हाेताे. घटस्फाेटासारखे टाेकाचे पाऊल उचलण्यापेक्षा पती-पत्नी वेगळ्या खाेल्यांमध्ये झाेपून या समस्येबाबत तडजाेड करतात.पण, त्याचा परिणाम लैंगिक आयुष्यावर हाेताे हे लक्षात ठेवावे लागेल.जगभरातील सुमारे निम्मे लाेक ‘खर्राटे’ घेतात. एका अंदाजानुसार, सुमारे 80 टक्के लाेक स्वत: घाेरतात किंवा घाेरणाऱ्या जाेडीदाराजवळ झाेपतात. म्हणजे, जाेडीदारांपैकी काेणीच घाेरत नसलेली फक्त वीस टक्के दांपत्ये आहेत आणि समस्या नसल्याने त्यांचे दांपत्य जीवन व्यवस्थित आहे. 80 टक्के दांपत्ये मात्र घाेरण्याच्या समस्येबराेबर झुंजत असून, त्यातून संबंध दुरावत जाऊन कटू पातळीवर येत आहेत.घाेरण्यामुळे तुटायला आलेले संबंध पुन्हा सुरळीत करणे हीच एक नवीन समस्या आता निर्माण झाली आहे.
वेगळ्या खाेल्यांमध्ये झाेपण्याचा मार्ग ‘सायकाॅलाॅजी टुडे’मधील एका संशाेधनानुसार, घाेरणारा जाेडीदार ही समस्या असली, तरी 25 ते 40 टक्के विवाहित दांपत्ये वेगळ्या खाेल्यांमध्ये झाेपून तडजाेड करतात. पण, त्यामुळे त्यांच्यातील भावनिक आणि शारीरिक जवळीक कमी हाेत जाऊन त्यांच्यातील नातेसंबंध तुटण्याच्या पातळीवर पाेहाेचतात. अशा दांपत्यांचे लैंगिक जीवनही वाईट असते.या स्थितीचा उल्लेख ‘स्लीप डिव्हाेर्स’ या संज्ञेद्वारे केला जाताे.यात जाेडीदार पूर्णपणे वेगळे हाेत नसले, तरी नाते असूनही त्यांच्यातील जवळीक कमी हाेत जाते.जाेडीदार जबाबदार नाही? कॅलिफाेर्निया विद्यापीठातील न्यूराेसायन्स अँड सायकाॅलाॅजी या विषयाचे प्राध्यापक मॅथ्यू वाॅकर म्हणतात, ‘श्वासाेच्छ्वासानंतर चांगली आणि गाढ झाेप ही निराेगी आयुष्यातील महत्त्वाची बाब आहे. घाेरण्याच्या सवयीचा नात्यावर नकारात्मक प्रभाव पडताे. मात्र, घाेरणारा जाेडीदार या स्थितीला जबाबदार नसल्याचे लाेकांच्या लक्षात येत नाही.
घाेरणे ही एक आराेग्यविषयक समस्या असून, तिच्याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. अशा जाेडप्यांनी डाॅ्नटरांची मदत घेतली पाहिजे.’ एक आराेग्यविषयक समस्या म्हणून घाेरण्याकडे पाहिले, तर ती सहज दूर करता येते. त्यासाठी अनेक औषधे आहेत. डाव्या कुशीवर झाेपण्यापासून वजन कमी करण्यापर्यंतचे काही उपायही आहेत. आपल्या डाॅ्नटरांच्या सल्ल्यानुसार ते करावेत.
पण, घाेरण्यामुळे तुटायला आलेले संबंध जाेडण्यासाठी काय करावे? डाॅ. शाॅन सूस यांच्या संशाेधनानुसार, घाेरण्याचा पहिला परिणाम शरीरावर आणि नंतर मनावर हाेताे. आपसांतील चर्चेमुळे घाेरण्याचे वैद्यकीय परिणाम कमी करता येत नसले, तरी त्याचा नकारात्मक प्रभाव कमी करता येत असल्याचे हे संशाेधन सांगत
 
 
Powered By Sangraha 9.0