चाळिशी गाठलेल्या व्य्नतींना तंदुरुस्तीसाठी टिप्स

    24-Apr-2024
Total Views |
 
 
 

health 
चाळीशीतील आहाराविषयी आहारात पुरेशा प्रमाणात कॅल्शियम असणारे अन्नपदार्थ असतील तर हाडांची झीज हाेण्याचा कालावधी वाढताे आणि दीर्घकाळात आपल्याला सांधेदुखी आणि हाडांच्या आजारांपासून लांब राहता येते. त्यामुळे आहारात दुग्धजन्य पदार्थ असावेत, डाळी असाव्यात, साेयाबीन तसेच अधून मधून काळ्या तिळाचा वापर आहारात करावा.कमी फॅट असणारे पदार्थ तसेच उच्च प्रमाणात तंतुमय घटक असणारे पदार्थ राेजच्या आहारात असावेत. पूर्ण धान्य, डाळी, फळे, भाज्या, तेलबिया म्हणजेच शेंगदाणे-बदाम अशा गाेष्टी आहारात असाव्यात. या घटकांमुळे शरीराला फायबर मिळते तसेच अँटीऑ्निसडंट्स विटामिन्स आणि खनिजे मिळतात.
 
त्यामुळे वय वाढण्याची प्रक्रिया लांबणीवर पडते. त्याचबराेबर वयानुसार येणारे आजार आणि व्याधींना देखील प्रतिबंध हाेताे.चाळीशीनंतर झिंक किंवा जस्त हे खनिज शरीरासाठी अतिशय आवश्यक असते.इन्सुलिनसाठीच्या टिश्यूजना सेन्सिटाईज करण्याचे काम हे खनिज करत असते.त्याचबराेबर या खनिजामुळे साखर खाण्याची इच्छा कमी हाेते आणि प्रतिकारश्नती वाढते.
चाळीशी नंतर अनेक जणांचे वजन अचानक वाढते. त्यामागे अनियंत्रित गाेड खाणे किंवा साखर खाणे हे कारण असते. त्यामुळेच काळे तीळ किंवा पांढरे तीळ अथवा भाेपळ्याच्या बिया यामध्ये नैसर्गिकरित्या झिंक असल्याने या गाेष्टी आहारात असतील तर र्नतातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यास मदत हाेते.
 
चाळीशीनंतर साखर खाणे पूर्णपणे टाळावे. गाेडीसाठी खजूर किंवा मनुके, ताजी फळे, अंजीर खाण्यावर भर द्यावा.विटामिन बी बराेबरच अँटीऑ्निसडंटसाठी पूरक घटक सेवन केले तर वय वाढण्याची प्रक्रिया लांबते.पुरेशी प्रथिने शरीराला मिळावीत त्यासाठी राेज कमीत कमी एक अंडे, एक कप दही, एक कप डाळीचे वरण किंवा आमटी, 100 ते 200 ग्रॅम फिश अशा गाेष्टी आहारात असाव्यात. त्याखेरिज आलटून पालटून चिकन, पनीर याचाही आहारात समावेश करावा.शरीराला पुरेशा प्रमाणात प्रथिने मिळाल्यावर अनावश्यक भूक लागल्याची भावना निर्माण हाेत नाही. तसेच गाेड खावेसे वाटत नाही. शरीराला पुरेशा प्रमाणात प्रथिने मिळण्याने प्रतिकारश्नती देखील वाढते.