सर्वांत माेठा डाेनट केक

    24-Apr-2024
Total Views |
 
 

donad 
अमेरिकन शेफ निक डीगिओवन्नी आणि जपानी शेफ लॅन डेव्हिस या दाेघांनी मिळून 3 एप्रिल 2023 राेजी जगातील सर्वांत माेठा पिंक-आइस्ड डाेनट केक तयार केला. त्याचे वजन 102.5 किलाेग्रॅम (226 एलबी) हाेते. स्पाँज आणि बटरक्रीमचा वापर करून हा डाेनट केक तयार करण्यात आला हाेता. निक आणि लॅन यांनी यापूर्वी 20.96 किलाेग्रॅमचे (46 एलबी 3 औंस) जगातील सर्वांत माेठे चिकन नगेट तयार केले हाेते. 44.24 किलाेग्रॅमचा (97 एलबी 8 औंस) सर्वांत माेठा केक पाॅपही त्यांनी तयार केला हाेता आणि सर्वांत रुंद सुशी राेलही त्यांनी बनविला हाेता. सामन मासा, काकडी आणि राइस रॅपपासून तयार करण्यात आलेला हा राेल सागरी शैवालात गुंडाळण्यात आला हाेता आणि त्याची रुंदी हाेती 2.16 मीटर (7 फूट 1 इंच). किंग साइज बेडपेक्षासुद्धा हा राेल माेठा हाेता.