येरवडा, 19 एप्रिल (आ.प्र.) :
महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड येथील गेनबा सोपानराव मोझे विद्यालयातील इयत्ता दहावी मधील 2000-2008 या शैक्षणिक वर्षांतील माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यामध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांनी सहभाग घेतला. या दरम्यान शिक्षकांनी दिलेल्या आयुष्याच्या धड्यामुळे जीवनाचे गणित चांगले येत असल्याचे मत माजी विद्यार्थी प्रदीप मांढरे यांनी व्यक्त केले. तसेच, सर्व विद्यार्थ्यांनी मनात आपल्या शाळेबद्दल असणारी आपुलकी, कृतज्ञता व जिव्हाळा व्यक्त केला. सद्य:स्थितीमध्ये कोण-कोण कोणत्या क्षेत्रात व कोणत्या पदावर कार्यरत आहे, याबाबत आपले अनुभव कथन केले. याप्रसंगी स्नेहमेळाव्याचे अध्यक्ष प्रशालेचे मुख्याध्यापक जालिंदर भागवत आणि सयाजीनाथ महाराज विद्यालयाचे मुख्याध्यापक राजकुमार गायकवाड, प्रशालेचे उपमुख्याध्यापक लक्ष्मण यादव, पर्यवेक्षक सुनील वळसे, मारुती दसगुडे, उच्च माध्यमिक विभागाचे विभाग प्रमुख सतीश सूर्यवंशी, साईनाथ तांबे, शिक्षिका सुलभा इथापे, वर्षा काळे, उज्वला यादव या शिक्षकांनी मार्गदर्शन केले. शिक्षिका जयश्री बरडोल, सोनल सोनवणे, अविनाश महापुरे, संजय हुंबे, संजय जैनक, प्रवीण सोनवणे, सचिन नागरगोजे, चित्रकला शिक्षक जेम्स साकरे यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले. यावेळी ओमकार पवार, विनायक सकीनाल, आकाश हरगुडे, बालाजी महानवर, दिनेश जाधव, तेजस राजगुरू, प्रशांत जाधव, रुपेश कदम, हृषिकेश सुर्वे, राखी शिरसाट, मयुरी गोडसे, अंकिता जवळकर, श्रद्धा भिंगारदिवे, अमृता मोरे, अक्षदा बावले, रश्मी शिंदे, पूजा चव्हाण, नेहा माळी, पूजा देवकर, स्नेहल कुंभार आदी माजी विद्याथी उपस्थित होते.