म्हणाेनि विश्वपण जावें । मग मातें घेयावें । तैसा नव्हे आघवें । सकटचि मी ।। 14.380

19 Mar 2024 12:13:35
 
 
 
saint
ज्ञानेश्वरांच्या विशेष तत्त्वज्ञानाचे दर्शन घडविणारी ही ओवी आहे. ईश्वराचा व विश्वाचा संबंध कसा आहे हे या ओवीत ज्ञानेश्वर स्पष्ट करतात. विश्वाला वगळून परमात्मा शाेधावा हे ठीक नाही. विश्वासकटच परमात्म्याचा शाेध घेणे अगत्याचे आहे आणि असा शाेध गुणातीत पुरुष घेत असताे. ताे भक्तीने ईश्वराची उपासना करताे.ताे गुणांच्या पलीकडे जाताे. व ब्रह्मत्वाचे स्थान मिळविताे. ताे ईश्वरावाचून दुसरीकडे काेठेही मन गुंतवत नाही. भजनाच्या द्वारे ताे देवाची उपासना करीत असताे. त्याची ही भक्ती कशी असते? एकनिष्ठा कशी असते? या प्रश्नांचे उत्तर देताना ज्ञानेश्वर म्हणतात की, रत्नाच्या ठिकाणी असलेले तेज जसे रत्नच आहे, अथवा ओलेपण म्हणजेच पाणी आहे,अथवा पाेकळी म्हणजे आकाश आहे किंवा गाेडी साखरेवाचून वेगळी नसते. पाकळ्या म्हणजेच कमल हाेते.
 
वृक्ष म्हणजेच ांद्या, फळे, वगैरे हाेत. र्बफ गाेठून एकत्र झाले की हिमालय पर्वत हाेताे.विरजलेले दूधच दही हाेते, त्याप्रमाणे विश्व ज्याला म्हणतात ते सर्व मीच आहे. चंद्रबिंब न साेलताच त्याचा आस्वाद घेता येताे. तुपाचा घट्टपणा न साेडता ते जसे तूपच असते, साेन्याचे कडे हे आटविले नसताना जसे साेनेच असते.वस्त्राचे धागे न उकलता ते वस्त्र म्हणजे दाेरा आहे हे ध्यानात येते. मातीची घागर विरघळली नाही तरी ती माती आहे हे धान्यात येते. याप्रमाणे विश्व दूर करून मला शाेधावे हे बरे नाही, तर या सर्व विश्वासकटच मी आहे.असे मला जाणणे म्हणजे नि:सीम भक्ती हाेय.सर्व भेदांना दूर करून आपणांसकट मला जाणावे.साेन्याची टिकली जशी साेन्यावर बसविलेली असते, त्याप्रमाणे माझ्याहून वेगळे काही मानू नये.पृथ्वीवरील सर्व परमाणू पृथ्वीरूपच असतात.
Powered By Sangraha 9.0