मकर

    25-Feb-2024
Total Views |
 
 
Horoscope
हा आठवडा तुमच्या कार्यक्षेत्रात जबरदस्त यश घेऊन येईल. तुमचा पैसा जास्त खर्च हाेईल आणि कमी प्रमाणात मिळेल. सामाजिक क्षेत्रात तुमची वाहवा हाेईल. तुमच्या मनात राग व आवेशाची भावना असल्यामुळे लाेकांसाेबत सांभाळून वागावे. बाेलण्यावर ताबा ठेवावा.
 
 नाेकरी-व्यवसाय : या आठवड्यात करिअरच्या दृष्टीने सामान्य परिणाम मिळतील पण तुम्ही तुमच्या परिश्रमाच्या जाेरावर तुमच्या कामात यश मिळवू शकाल. जे जातक कंपनीत काम करीत आहेत त्यांची प्रगती हाेईल. तर व्यवसाय करणाऱ्या जातकांचा या आठवड्यात फायदा हाेईल.
 
 नातीगाेती : या आठवड्यात तुमच्या घरात आनंदाचे वातावरण राहणार आहे. घरात एखादा पाहुणा आल्यामुळे आनंद पसरेल. कुटुंबीयांसाेबत माैजमस्ती करण्याची संधी लाभेल. जरी कुटुंबातील एखाद्यासाेबत तुमचा वाद झाला तरी संपूर्ण कुटुंबाचे सहकार्य तुम्हाला कायम मिळत राहील.
 
 आराेग्य : या आठवड्यात तुम्ही तुमच्या आराेग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. आळस तुमच्यावर स्वार हाेणार नाही असा तुम्ही प्रयत्न करायला हवा.या आठवड्यात तुमच्यात अशक्तपणा, थकवा असण्याची श्नयता आहे. ते टाळण्यासाठी तुम्ही तुमच्या खाण्या-पिण्याकडे लक्ष द्यायला हवे.
 
 शुभदिनांक : 25, 29, 2
 
 शुभरंग : केशरी, निळा, जांभळा
 
 शुभवार : बुधवार, शुक्रवार, शनिवार
 
 दक्षता : या आठवड्यात काेणतेही काम मनमानीने न करता संयमाने करावे.
 
 उपाय : या आठवड्यात गुळ-फुटाणे दान करा. ‘ॐ रां रामाय नम:’ मंत्राचा जप करा.