कन्या

25 Feb 2024 15:20:55
 
 

Horoscope 
 
हा आठवडा तुमच्या करिअरसाठी उत्तम आहे. तुमच्या व्यापाराचा विस्तार हाेण्याची श्नयता राहील. कार्यक्षेत्रात सहकर्मचाऱ्यांशी मतभेद हाेण्याची श्नयता आहे. तुम्हाला तुमच्या परिश्रमाचे व प्रयत्नांचे उत्तम फळ मिळेल. व्यापरा वा कामासाठी परदेशी कंपन्यांशी संबंध जाेडाल.
 
 नाेकरी-व्यवसाय : या आठवड्यात तुम्हाला तुमच्या सासरकडून आर्थिक मदत मिळू शकते. कुटुंबात सासू-सुनेत सख्य वाढेल. जर मुलांच्या शिक्षणात काही अडथळा येत असेल तर ताेही दूर हाेईल. आर्थिक कारणांवरून नातलगांसाेबत खटका उडू शकताे. घरात पूजापाठाचा कार्यक्रम हाेऊ शकताे.
 
 नातीगाेती : हा आठवडा काैटुंबिक जीवनासाठी अत्यंत अनुकूल राहणारा आहे. आई-वडिलांची तब्येत उत्तम असल्यामुळे घरात आनंदाचे वातावरण असेल. कुटुंबात एखादा शुभ व मंगल कार्यक्रम आयाेजित करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. घराच्या गरजेनुसार तुम्ही खरेदी करताना दिसून येत आहात.
 
 आराेग्य : या आठवड्यात आराेग्याच्या दृष्टिकाेनातून तुम्हाला संमिश्र परिणाम पाहायला मिळतील. तुमच्या स्वभावात क्राेधाचे प्रमाण वाढू शकते. त्यावर तुम्ही ताबा मिळवायला हवा. कामाचा व्याप वाढल्यामुळे तुमच्यावर मानसिक दबाव वाढू शकताे. मनावर जास्त ताण घेऊ नये.
 
 शुभदिनांक : 25, 29, 02
 
 शुभरंग : केशरी, निळा, जांभळा
 
 शुभवार : बुधवार, शुक्रवार, शनिवार
 
 दक्षता : या आठवड्यात मनात नकारात्मक विचारांना थारा देऊ नका.
 
 उपाय : या आठवड्यात तांदूळ व साखर दान करा. श्री दुर्गाचालिसा वाचा.
Powered By Sangraha 9.0