वृश्चिक

    25-Feb-2024
Total Views |
 
 

Horoscope 
हा आठवडा तुमच्यासाठी खूपच चांगला ेआहे. तुम्ही रागावल्यास त्यामुळे तुमचेच नुकसान हाेणार आहे. शारीरिक आणि मानसिक अस्वस्थतेने तुम्ही त्रस्त राहाल. विराेधक आणि प्रतिस्पर्धकांसाेबत वाद घालत बसू नये. व्यावसायिक ठिकाणी वरिष्ठांचे वागणे नकारात्मक असेल.
 
 नाेकरी-व्यवसाय : करिअरच्या दृष्टीने हा आठवडा संमिश्र परिणाम घेऊन येत आहे. या काळात तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रात प्रगती लाभेल. ज्या क्षेत्रात नाेकरी करीत असाल तिथे यश मिळवण्यासाठी तुम्हाला जास्त मेहनत करावी लागेल. ज्यामुळे तुम्हाला लवकर यश मिळेल.
 
 नातीगाेती : या आठवड्यात मित्रांच्या भेटीगाठी हाेतील. कुटुंबासाेबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. मुलांसाठी जास्त खर्च करावा लागेल. तुमचा स्पष्टवक्तेपणा तुम्हाला तुमच्या नातेवाईकांपासून दूर करू शकताे. आई- वडिलांसाेबत एखाद्या तीर्थयात्रेला जाऊ शकता.
 
 आराेग्य : या आठवड्यात तुम्हाला तुमच्या आराेग्यक्षेत्रात संमिश्र स्वरूपात परिणाम मिळू शकतात. तुम्हाला मानसिक अस्वस्थता राहू शकता. अशा स्थितीत राेज ध्यान आणि याेग करू शकता. काेणत्याही प्रकारची बेपर्वाई करू नये अन्यथा तुमच्यासाठी हे घातक ठरू शकते.
 
 शुभदिनांक : 26, 27, 1
 
 शुभरंग : केशरी, जांभळा, भुरा
 
 शुभवार : साेमवार, गुरुवार, शनिवार
 
 दक्षता : या आठवड्यात काेणतेही काम घाईगडबडीत करू नये. अन्यथा काम बिघडू शकते.
 
 उपाय : या आठवड्यात तांब्याचे कडे धारण करावे. श्री हनुमान चालिसा वाचावी.