हा आठवडा तुमच्यासाठी ठीकठाक असणार आहे. तुम्ही तुमची कामे अधिक विश्वासाने करू लागाल. जर तुमचे काम उत्पादनासंबंधित असेल तर तुम्हाला अनुकूल परिणाम मिळतील. तुमची कमाई चांगली राहील. बाहेरील प्रकरणांमध्ये जास्त हस्तक्षेप करणे टाळावे आणि आपल्या कामावर जास्त फाेकस करावा.
नाेकरी-व्यवसाय : या आठवड्यात तुमचे करिअर जीवन चमकू शकते.नाेकरीत बदली हाेण्याचीही श्नयता आहे. ऑफिसात सीनियर्सच्या मदतीने तुम्ही यशाच्या पायऱ्या चढाल पण ऑफिस वा कार्यस्थळावरील तुमच्या विराेधकांपासून जपावे. विद्यार्थ्यांना अनुकूल परिणाम देणारा आठवडा.
नातीगाेती : या आठवड्यात तुमचे काैटुंबिक जीवन संमिश्र स्वरुपाचे राहणार आहे. तुम्हाला तुमच्या कुटुंबीयांची मदत मिळू शकते पण कामाच्या व्यापामुळे तुम्ही तुमच्या कुटुंबाला पुरेसा वेळ देऊ शकणार नाही.वडिलाेपार्जित संपत्तीबाबतचा वाद मिटेल. आई-वडिलांच्या सेवेने मनाला समाधान लाभेल.
आराेग्य : या आठवड्यात तुमचे आराेग्य उत्तम राहील. उत्तम आराेग्यामुळे तुमचे मनाेबलही उत्तम राहील. हवामान बदलामुळे छाेटे-माेठे शारीरिक त्रास हाेण्याची श्नयता आहे पण त्याचा तुमच्या तब्बेतीवर फारसा परिणाम हाेणार नाही. कामाच्या व्यापामुळे मानसिक दडपण राहील.
शुभदिनांक : 25, 29, 02
शुभरंग : भूरा, पांढरा, निळा
शुभवार : रविवार, साेमवार, बुधवार
दक्षता : या आठवड्यात समस्या साेडवण्यासाठी धैर्याने काम करावे.
उपाय : या आठवड्यात मुलांना गुळाचे पदार्थ खाण्यास द्यावेत आणि ‘ॐ आंजनेयाय नम:’ मंत्राचा जप करावा.