कुंभ

25 Feb 2024 13:33:10
 
 
 

Horoscope 
हा आठवडा तुमच्यासाठी उत्तम राहणार आहे. एखाद्या अकस्मात उद्भवलेल्या कारणामुळे तुम्हाला प्रवास करावा लागू शकताे. तुम्ही कल्पकतेने रचनात्मक काम करू शकाल. तुमचे मन आनंदी राहील. आर्थिक याेजनेत तुम्हाला सुरुवातीला जरी त्रास झाला तरी नंतर सहजतेने काम करू शकाल.
 
 नाेकरी-व्यवसाय : हा आठवडा नाेकरदारांसाठी संमिश्र स्वरूपाचा असू शकताे. काही बाबतीत भाग्याचीही तुम्हाला साथ मिळेल. व्यावसायिक क्षेत्रात तुम्ही यश मिळवू शकाल. विद्यार्थ्यांसाठीही हा आठवडा यश देणारा आहे. तुम्ही तुमच्या मेहनतीच्या बळावर काेणत्याही क्षेत्रात यश मिळवू शकाल.
 
 नातीगाेती : हा आठवडा तुम्ही तुमच्या कुटुंबातील व्यक्तींसाेबत आनंदात घालवणार आहात. जर मुले विवाहयाेग्य असतील तर त्यांच्यासाठी स्थळांशी बाेलणी करू शकता. घरात काही दिवसांपासून असलेले अशांत वातावरण निवळेल. तुम्ही तुमच्या कुटुंबाविषयीची तुमची जबाबदारी व्यवस्थित जाणाल.
 
 आराेग्य : या आठवड्यात तुम्हाला तुमच्या आराेग्याबाबत संमिश्र परिणाम मिळणार आहेत. तुम्हाला मानसिक अस्वस्थता राहू शकते; पण तुम्ही तुमच्या मनावर ताबा ठेवण्यात यशस्वी हाेऊ शकता. तुम्ही राेज याेगाभ्यास करावा.त्यामुळे तुमचे आराेग्य व्यवस्थित राहू शकेल.
 
 शुभदिनांक : 25, 29, 2
 
 शुभरंग : गुलाबी, पांढरा, लाल
 
 शुभवार : मंगळवार, गुरुवार, शुक्रवार
 
 दक्षता : या आठवड्यात तुम्ही तुमच्या क्षमतेचा याेग्य वापर करण्याची गरज आहे.
 
 उपाय : या आठवड्यात तुम्ही पंचमुखी रुद्राक्ष धारण करावे. ‘ॐ हिरण्यगर्भाय नम:’ मंत्राचा जप करावा.
Powered By Sangraha 9.0