नवी मुंबई महापालिकेच्या निवृत्त कर्मचाऱ्यांचा सन्मान

04 Dec 2024 14:32:36
 
 
nav
 
नवी मुंबई, 3 डिसेंबर (आ.प्र.) :
 
नवी मुंबई महापालिकेच्या यशात प्रत्येक अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आपल्या परीने महत्त्वाचा वाटा उचलला आहे. सेवानिवृत्ती हा प्रत्येक कर्मचाऱ्याच्या जीवनातील अपरिहार्य भाग आहे. निवृत्तीनंतरच्या आयुष्याच्या दुसऱ्या डावात आपल्या आवडीचा छंद जोपासा. कुटुंबीयांना वेळ द्या व महत्त्वाचे म्हणजे आरोग्याकडे लक्ष द्या, अशा शब्दांत अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांनी सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. नवी मुंबई महापालिकेच्या सेवेतून नोव्हेंबरमध्ये निवृत्त होणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती शुभेच्छा समारंभात पवार बोलत होते.
 
प्रशासन विभागाचे उपायुक्त शरद पवार, महापालिका सचिव चित्रा बाविस्कर, सहायक आरोग्य अधिकारी डॉ. रत्नप्रभा चव्हाण, विधी अधिकारी अभय जाधव आणि इतर अधिकारी, कर्मचाऱ्यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. निवृत्त होणारे लेखा अधिकारी दीपक पवार, स्वच्छता अधिकारी सूर्यकांत म्हात्रे, मुख्याध्यापक सागरनाथ भंडारी, मुख्याध्यापिका प्रतिभा पांचाळ, सहायक अधिसेविका स्मिता विचारे, सिस्टर इन्चार्ज विमल वानखेडे, प्लंबर-फिटर नंदकुमार थोरात, शिपाई मधुकर निकम, कक्षसेविका सुमती पवार व वरिष्ठ लिपिक पुरुषोत्तम घरत यांचा शाल, पुष्पगुच्छ व सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
Powered By Sangraha 9.0